मेष
नवीन कामे करण्याकरता उत्साह वाढेल. कुटुंबातील वातावरण पोषक असेल. तब्येतीची तक्रार होऊ शकते. निर्भीड वागण्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. प्रवासातून धनलाभ होऊ शकतो. वादविवादात जय मिळेल. इन्व्हेस्टमेंट करताना सांभाळून रहा. नोकरदार वर्गाने आपली इमेज सांभाळावी. वैवाहिक जीवनात ताणतणाव संभवतो.
उपाय- लाल गायीची सेवा करावी.
वृषभ
व्यक्तित्वाला झळाळी येईल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. पैशांच्या बाबतीत भाग्यवान असाल. नवीन दागिना खरेदी करायचा प्लॅन कराल. आईच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. प्रेम प्रकरणात अपेक्षाभंग संभवतो. नोकरदार वर्गाने वरिष्ठांची मर्जी राखावी. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तीर्थयात्रेचा योग संभवत आहे.
उपाय -केळीच्या झाडाची पूजा करावी.
मिथुन
निराशा दूर होईल. तब्येतीची उत्तम साथ मिळेल. धन प्राप्तीचा आनंद घ्याल. एफडी किंवा गुंतवणूक करण्याकडे कल असेल. प्रवास शक्मयतो टाळावा. कागदोपत्री व्यवहारात सावध रहावे. मातृ च्ंिाता वाटू शकते. जमिनीचे व्यवहार पुढे ढकलावेत. शेअर मार्केटसारखी धोकादायक गुंतवणूक करू नये.
उपाय – लहान मुलीला हिरव्या बांगड्या भेट द्याव्या.
कर्क
आशादायक वातावरण तयार होईल. येणारा काळ हा छोट्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळवून देणारा असेल. पण त्याकरता चिकाटी आणि अभ्यासाची गरज आहे नोकरदार वर्गाला अंतर्गत राजकारणापासून सावध रहावे लागेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील. एखादी व्यक्ती कळत नकळत नाव खराब करू शकते.
उपाय – गरजवंताला पांढरे वस्त्र दान द्यावे
सिंह
तब्येतीच्या बाबतीत तुम्ही जागरूक जरी असला तरीसुद्धा येणारे काही दिवस आरोग्याला सांभाळावे लागेल. सर्दी, पडसे, डोकेदुखी सारखे आजार त्रास देऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या हट्टामुळे वातावरण बिघडू शकते. कागदपत्रे गहाळ होणे किंवा कागदोपत्री व्यवहारात चूक होणे अशा घटना घडू शकतात.
उपाय – घराच्या पूर्वेकडील हनुमानाचे दर्शन घ्यावे
कन्या
मनाविरुद्ध एखादी लहानशी जरी घटना घडली तरी नैराश्य येऊ शकते. अशावेळी निराश न होता सकारात्मक विचार करावा. घरातील सदस्यांमध्ये लहान-सहान गोष्टींवरून भांडण होऊ शकते. प्रवास घडेल. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीत अप्रिय घटना घडू शकते. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात.
उपाय -सरकारी शाळेत वह्या दान द्याव्यात.
तूळ
आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. व्हायरल आजार त्रास देऊ शकतात. धनप्राप्ती उत्तम असेल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे मोठे काम होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. धोकादायक गुंतवणूक टाळावी. टाईमपास न करता कष्टाकडे लक्ष देण्याची वेळ आहे.
उपाय -पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात.
वृश्चिक
आरोग्यम् धनसंपदा हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. जिथे पैसे अडकले आहेत, तिथून पैसे परत मिळवण्याकरता अतिरिक्त कष्ट करावे लागतील. कागदोपत्री व्यवहारांमध्ये यश मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ स्त्रीच्या तब्येतीची काळजी वाटेल. नोकरदार वर्गाने कामात चूक होऊ देऊ नये. वैवाहिक सुख उत्तम असेल.
उपाय – हनुमानाला विडा अर्पण करावा
धनु
येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान वाटेल. पैशांची आवक उत्तम असल्यामुळे बरेचसे प्रश्न सुटतील. तब्येतीला जपावे. प्रवासात धनहानी संभवते. गुंतवणुकीच्या नावाखाली एखादा माणूस तुम्हाला फसवू शकतो. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे. अपघातापासून सावध राहा.
उपाय – गणेश उपासना करावी
मकर
नैराश्य दूर होईल. मनासारखी कामे होतील. तब्येतीची साथ मिळेल. प्रवास संभवतो. कुटुंबात थोडेबहुत क्लेश कलह होऊ शकतात. छोट्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो नोकरदार वर्गाला चांगला मोबदला मिळेल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. हितशत्रूपासून सावध रहा.
उपाय – पाण्यात काळे तीळ घालून शंकराला अभिषेक करावा
कुंभ
घरातील वाद-विवादामुळे डिस्टर्ब होऊ शकता. संवाद साधताना योग्य त्या शब्दांचा उपयोग करा अन्यथा, हाती आलेले काम जाऊ शकते. प्रवासातून फायदा होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. छोटाशा गोष्टींवरून वैवाहिक जोडीदाराचे मतभेद संभवतात.
उपाय- लाजाळूचे मूळ जवळ ठेवावे
मीन
आजार त्रास देऊ शकतात. कुटुंबातील व्यक्तींची योग्य वेळेला साथ न मिळाल्यामुळे मन उदास होऊ शकते.. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमात यश मिळेल. नोकरदार वर्गाला सावध राहण्याची गरज आहे. जोडीदाराशी वाद-विवाद संभवतात.
उपाय – लाल विटेचा एक तुकडा जवळ ठेवावा.





