मेष
आठवड्याची सुऊवात काहीशी निराशाजनक असली तरी कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे आणि मित्रांच्या प्रोत्साहनामुळे बऱ्याच प्रमाणात मदत मिळेल. या आठवड्यात तुम्ही बऱ्याच प्रमाणात सक्रिय असाल. काही जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. मंगल कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. एकंदर हा आठवडा तुम्हाला संमिश्र्र असणार आहे.
आंब्याची पाच पाने जवळ ठेवावी
वृषभ
आरोग्याची साथ असली तरी कसेही वागून किंवा कुपथ्य करून चालणार नाही. आरोग्य उत्तम तर सगळे सर्वोत्तम हा मंत्र ध्यानी ठेवावा. या आठवड्यामध्ये आर्थिक समस्या येऊ शकतात पण तुमच्या बुद्धी चातुर्याने यावर मात कराल. एखादा निर्णय घेण्याकरता जोडीदाराची मदत घ्यावी लागेल. कुटुंबात मंगल कार्याबद्दल चर्चा होईल.
केळीच्या झाडाची पूजा करा
मिथुन
तब्येतीच्या छोट्या-मोठ्या तक्रारी त्रास देऊ शकतात. विशेष म्हणजे या आठवड्यामध्ये घरातील एकापेक्षा जास्त सदस्यांना आरोग्याचा त्रास होऊ शकतो. समाजाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्तम आहे. कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवत असताना परतावा नीट मिळेल का हे नक्की करा.
आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घाला
कर्क
आपल्या वैयक्तिक स्वार्थाकरता जवळच्या लोकांचा उपयोग करणे तुमच्या जोडीदाराला आवडणार नाही. या कारणावरून वादविवादाची वेळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी इतर लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन सगळ्यांच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. या आठवड्यात काही अवघड कामे पूर्ण कराल. ऐनवेळी एखाद्याला पैसे द्यावे लागतील.
गंगाजल शेतात शिंपडावे
सिंह
कामांमध्ये चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही कारणाने दुसऱ्यांवर काम टाकणे टाळा तब्येतीच्या लहान सहान तक्रारी संभवतात .अकारण मन उदास होऊ शकते. एखाद्या व्यक्तीवरील अतिविश्वास धोकादायक ठरू शकतो. अनावश्यक वस्तुंवर खर्च होण्याची शक्मयता आहे. परिवारातील सामंजस्य वाढेल.
तहानलेल्या पशुंसाठी पाण्याची सोय करावी.
कन्या
एखाद्या स्त्रीमुळे फायदा होण्याची शक्मयता आहे. पाण्याच्या ठिकाणी प्रवास करण्याचा योग संभवतो. परिवारातील वातावरणाला सुखमय कराल. या आठवड्यात मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत वेळ घालवाल. आयत्यावेळी कोण कामाला येतो हे तुम्हाला कळेल. घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटू शकते.
केळीच्या झाडाजवळील माती जवळ ठेवावी
तूळ
तुमच्या आजूबाजूला विश्वास ठेवता येण्यासारखे किती जण आहेत याचा साक्षात्कार करून देणारा हा आठवडा असेल. आयत्यावेळी कोण कामाला येतो हे तुम्हाला कळेल. घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. पैशांच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा करू नका. प्रेमीजनांनी पुढचा विचार करावा.
लाल रंगाचा हातऊमाल जवळ ठेवावा
वृश्चिक
नवे संकल्प सिद्ध होतील पण तुम्ही विचार केलेल्या कामाचा किंवा कल्पनेचा फायदा तिसराच कोणीतरी उचलण्याची दाट शक्मयता आहे. त्यामुळे आपल्या योजना गुप्त ठेवाव्या. परिवारातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटू शकते .वैवाहिक जीवन सुखमय असेल. आर्थिक बाबतीमध्ये येणे कमी आणि देणे जास्त अशी परिस्थिती होऊ शकते.
मुंग्यांना साखर घालावी
धनु
आनंदाची बातमी कळेल. तब्येतीला सांभाळावे लागेल. व्यवसायाच्या माध्यमातून नवीन ओळखी होतील. आर्थिक देवाणघेवाणीच्या बाबतीत समोरची व्यक्ती तुमचा फायदा उचलू शकते. या आठवड्यात भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कोणावरही आंधळा विश्वास घातक ठरू शकतो.
पिंपळाचे न फाटलेले पान जवळ ठेवावे
मकर
ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. परिवारासोबत वेळ घालवल्यामुळे मन आनंदी असेल. जवळच्या एखाद्या ठिकाणाला भेट द्याल. धार्मिक कार्यात रस घ्याल. जुनी एखादी चिंता तुम्हाला सतावू शकते. परिवारातील व्यक्तींची मने सांभाळावी लागतील. जास्त दमछाक होऊ देऊ नका.
लहान मुलीला हिरवे वस्त्र दान करावे
कुंभ
गेल्या काही दिवसांपासून घरात आणि कामाच्या ठिकाणी असलेला विसंवाद निवळू लागेल. काही वेळ तुम्हाला तणावमुक्त रहावे असे वाटेल. एखाद्या सुट्टीची किंवा एखाद्या ब्र्रेकची गरज आहे हेही तुम्हाला जाणवेल. आर्थिक आवक थोडी कमी असली तरी समाधानाचे क्षण मिळतील.
आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने घालावीत.
मीन
कर्तृत्वाला वाव आणि धडाडीला संधी मिळेल. हाती घेतलेल्या कामाला यश मिळेल. कित्येक संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील पण त्यातल्या योग्य संधींची निवड करणे महत्त्वाचे ठरेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य हेही महत्त्वाचे आहे. चिडचिड केल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.
सुलेमानी हकीक जवळ ठेवावा
जे लोक आर्थिक धोका असलेली कामे करतात ( जसे की शेअर मार्केट) किंवा आर्थिक प्राप्तीमध्ये सातत्य नसते, कायम कमी जास्त पणा होत असतो अशांकरता हा उपाय आहे. एका काचेच्या ग्लासात पाणी घेऊन त्यात 7 चिमूट मीठ मिसळावे. हा ग्लास घराच्या नैर्त्रुत्य दिशेला शनिवारी ठेवावा. त्याच्यावर लाल रंगाचा झिरो बल्ब लावावा. दर महिन्याला पाणी बदलावे.





