मेष
मन अध्यात्माकडे वळण्याची शक्मयता आहे. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. एखाद्या संत महात्म्याची कृपा होण्याची शक्मयताही नाकारता येत नाही. चांगल्या कामाकरता पैसा खर्च होईल. मंगल समारंभामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या विऊद्ध काही कारवाया करू शकतात त्यामुळे सावध राहणे गरजेचे असेल.
पिंपळाचे पान जवळ ठेवा
वृषभ
भावनेच्या भरात कुठलाही घेतलेला निर्णय नंतर पश्चात्तापाला कारणीभूत होऊ शकतो. आर्थिक बाबतीमध्ये तंगी जाणवत असेल तर करत असलेल्या कामाला वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या रीतीने करण्याची गरज आहे. जे लोक सिंगल आहेत आणि नव्या रिलेशनशिपसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना चांगली बातमी कळेल. वेळेचा सदुपयोग करा.
पांढरा रुमाल जवळ ठेवा
मिथुन
तुझे आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी अशी काहीतरी परिस्थिती या आठवड्यात अनुभवायला येऊ शकते. सगळे काही असूनसुद्धा काहीतरी चुकत आहे असे वाटण्याची शक्मयता आहे. या आठवड्यात दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठलाही प्रकारचा राग किंवा द्वेष ठेवू नका, त्याचा उलट परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. एखादे भांडण झाल्यास लवकर मिटवा.
साखर दान द्यावी
कर्क
स्वभावामध्ये उदारता येईल. दुसऱ्यांना मदत करण्याच्या नादात स्वत:चे नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. एखादा नातेवाईक आर्थिक सहाय्य मागू शकतो. तब्येतीला जपावे लागेल. सहलीचा प्लॅन करत असाल तर सामानाची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यामध्ये काही घटना अशा घडतील की ज्याने आश्चर्य वाटेल. दुखापतीपासून पायाला जपा.
मजुरांना ताक द्यावे
सिंह
मित्रांबरोबर हिंडणे फिरणे आणि मौजमजा करणे याच्यापेक्षा स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष दिले तर जास्त योग्य ठरेल. पूर्वी जास्त ओळख नसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून केलेली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. या आठवड्यात काही लोक तुमचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी थोडे त्रासाचे वातावरण जाणवेल.
अन्नदान करा
कन्या
सध्याचा काळ हा आत्मचिंतनाचा काळ आहे हे ध्यानी घ्या. आपल्या हातून घडणाऱ्या बऱ्या वाईट कर्मांसाठी आपणच जबाबदार असतो. राहत्या घरापासून दूर असलेली जमीन जर विकण्याचा प्रयत्न करत असाल तर चांगला नफा मिळू शकतो. व्यापारी वर्ग जो लांबच्या ठिकाणाहून वस्तूंची खरेदी विक्री करतो अशा लोकांना चांगला लाभ मिळेल.
मनगटावर 24 हा आकडा लिहावा
तूळ
मनातील राग आणि दुसऱ्यांच्या प्रती असलेला द्वेष यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. तुमच्या मनाप्रमाणे पैशाची आवक न झाल्याने मन जरा उदास होऊ शकते. नवीन संधींच्या बाबतीत हा आठवडा आशापूर्ण असेल. नाती मजबूत होतील. या आठवड्यात केलेली गुंतवणूक पुढच्या काळाच्या दृष्टीने चांगले फळ देऊ शकते.
एखाद्या धार्मिक स्थळी गरजवंतांना केळी द्यावी
वृश्चिक
आरोग्याच्या दृष्टीने सध्या अनुकूल कारण असल्याने खाण्यापिण्याच्या सवयींकडे चांगले लक्ष देणे गरजेचे असेल. या आठवड्यात धनसंचयाकडे विशेष लक्ष द्यावे. पुढे जाऊन पैशांचा प्रॉब्लेम होऊ नये याची काळजी घ्यावी. वैवाहिक जोडीदाराबरोबर फिरायला जायचा प्लॅन कराल. व्यापारी वर्गाने अति लोभापासून दूर राहण्याची गरज आहे.
पांढऱ्या कपड्यात हळद बांधून तिजोरीत ठेवावी
धनु
नको ते विचार मनात आल्याने त्रास होऊ शकतो. अशावेळी मनावर ताबा ठेवून शांत राहणे योग्य ठरेल. या आठवड्यात अनावश्यक खर्च करण्यापासून दूर रहा पण एखाद्या मंगल कार्यासाठी केलेला खर्च योग्य ठरेल. उपाहारप्राप्ती होईल. एखाद्या समारंभामध्ये भाग घेऊन चांगल्या लोकांच्या भेटीगाठी होतील. प्रवास घडेल.
लाल वस्तू दान द्यावी
मकर
तब्येतीकडे विशेष लक्ष देण्यासाठी काही प्लॅन कराल. या आठवड्यात मनोरंजनाकडे जास्त कल असेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर आर्थिक बाबतीत काही मतभेद होऊ शकतात. पण तुमच्या शांत स्वभावामुळे भांडण टोकाला जाणार नाही. या आठवड्यात काही निर्णय असे घ्यावे लागू शकतात जिथे जास्त विकल्प असतील.
भटक्या जनावरांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करा
कुंभ
आर्थिक बाबतीमध्ये समाधानकारक आठवडा असला तरी जर अनेक स्रोत असतील तर त्यातील एकाच स्रोतातून फायदा होईल. घरातील किंवा कुटुंबातील काही बदल तुम्हाला भावनिक करू शकतात. या आठवड्यात तुमच्या प्रतिमेला तडा जाईल असे कोणतेही वर्तन हातून घडणार नाही याची काळजी घ्यावी. वैवाहिक जोडीदारामुळे त्रास जाणवेल.
मुंग्यांना साखर घालावी.
मीन
परिवारातील सदस्यांच्या आजारपणामुळे खर्च वाढेल आणि त्यामुळे चिंता वाटू शकते. अचानक काही न टाळता येणाऱ्या खर्चामुळेसुद्धा आर्थिक तंगी जाणवू शकते. आपल्या कामावर आणि प्रायोरिटीजवर जास्त फोकस देण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी काही कामे तुमच्या मनाप्रमाणे घडतील. नवीन संधी प्राप्त होण्याची शक्मयता आहे.
कोहळ्याचे दान द्यावे
आयुष्यामध्ये काही वेळा काही काळ असा येतो की ज्यामध्ये घटना अचानक घडतात. आणि बऱ्याच वेळेला त्या मनासारख्या नसतात. अशावेळी लाल किंवा हिरव्या स्केचपेनने डाव्या हाताच्या मनगटावर 39 हा आकडा लिहावा. घटनांची तीव्रता आणि मानसिक त्रास कमी होण्याला मदत मिळते.





