बुधवार दि. 12 एप्रिल 23 मंगळवार दि. 18 एप्रिल 23 पर्यंत
लॉ ऑफ अट्रक्शन
या लेखमालेचा उद्देश ‘लॉ ऑफ अट्रक्शन’ सारख्या नवीन संकल्पनेचा ज्योतिषीय उपायाच्या दृष्टीने कसा उपयोग करून घेता येईल हा आहे. केवळ ग्रहांच्या उपायांपेक्षा, किंवा पारंपरिक तोडग्यांच्या पलीकडे जाऊन जागतिक स्तरावर ज्या नवनवीन कल्पना उपयोगील्या जात आहेत त्यांची ओळख वाचकांना करून देण्याचाही मानस आहे. काही लोक याला सुडो सायन्स म्हणून हिणवतात. पण द सिपेट या पुस्तकापासून सुरू झालेल्या या क्रांतीने कित्येकांचे भले झाले आहे यात शंकाच नाही. लॉ ऑफ अट्रक्शन हे 3 नियमांवरती चालते. (1) जसे साधन तसे साध्य. याप्रमाणे दोन एकसारख्या वागणाऱया व्यक्ती एकमेकाला आकर्षित करतात त्याचप्रमाणे सृष्टीचा हा नियम आहे की जशी तुमची विचारसरणी असते त्याचप्रमाणे घटना घडतात. म्हणजे विचारांनासुद्धा घटनांना आकर्षित करण्याची शक्ती प्राप्त आहे. सकारात्मक विचार सकारात्मक घटना घडवतात आणि नकारात्मक विचार नकारात्मक घटना घडवतात. (2) म्हणजे जिथे जिथे निर्वात जागा आहे तिथे तिथे निसर्गाला ती पोकळी भरून काढावीच लागते. उष्णतेमुळे वातावरण गरम होऊन ज्याप्रमाणे निर्वातसदृश स्थिती निर्माण होते आणि मग ढग येतात त्याप्रमाणे जर आपल्या आयुष्यातून नकारात्मकता बाहेर काढली तर तिथे सकारात्मक ऊर्जा निसर्गाला भरावीच लागते आणि त्यातून सकारात्मक घटना आयुष्यात घडतात. (3) म्हणजे सध्याचा क्षण हा संपूर्णच आहे, त्यात काही कमी नाही. या नियमानुसार सध्याच्या क्षणी कोणत्याही पद्धतीने तुम्ही या क्षणाला आणखीन सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला तर त्यातून सकारात्मक घटना घडणारच. या लॉ ऑफ अट्रक्शनचा आपल्या आयुष्यात कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उपयोग होऊ शकतो यावर एक नजर टाकूया. 1. नातेसंबंध सुधारण्याकरताः कित्येकांच्या आयुष्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी यांची कमी असते. याचे कारण कित्येकदा परिस्थिती नसून त्या माणसांचा स्वभाव असतो. प्रत्येकाला वाटते की आपल्या आयुष्यामध्ये प्रेम करणाऱया व्यक्ती असाव्यात, आपली काळजी घेणारी जीवाभावाची माणसं असावीत, पण व्यक्त करता येत नाही. प्रेमाला आकर्षित करता येत नाही. अशा ठिकाणी लॉ ऑफ अट्रक्शनचा जादूई उपयोग होऊ शकतो. 2. प्रगतीः कित्येक लोक त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने आणि तितकेच पैसे कमवत वर्षानुवर्ष खपत पडलेले असतात. त्यांना आयुष्यातील ध्येय ठरवण्याकरता लागणारी मानसिकता असते हेही कळत नाही. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ अशी मानसिकता असते. लॉ ऑफ अट्रक्शन आपल्या आयुष्यातील ध्येय, आपल्याला नक्की काय हवे आहे आणि ते कसे मिळवायचे यासाठी खूप उपयोगी ठरतो.3. आर्थिक सुबत्ताः नेपोलियन हिलच्या थिंक अँड ग्रुप रीच (विचार करा आणि श्रीमंत व्हा) या पुस्तकात याबद्दल खूप सुंदर लिहिलेले आहे. लॉ ऑफ अट्रक्शनमुळे आर्थिक स्थिती सुधारलेली कित्येक उदाहरणे देशात आणि प्रदेशात पहायला मिळतात. ही केवळ काही उदाहरणे सांगितली. लॉ ऑफ अट्रक्शनचा उपयोग आपण आयुष्यातील प्रत्येक ठिकाणी करू शकतो.
महा उपायः प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम, टेन्शन, अडचणी असतातच. याकरता नियमित करायचा उपाय म्हणजे मंगळवारी एका नारळावर थोडं कुंकू वाहून तो नारळ एका लाल कापडात बांधून, त्यावर लाल दोरा सात वेळा लपेटून हातात धरून आपले प्रॉब्लेम्स सात वेळा सांगावे. मारुतीच्या मंदिरात हा नारळ हातात घेऊन सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग तो नारळ निर्जन ठिकाणी सोडून यावा
मेष
भाग्याची उत्तम साथ आहे. मानसन्मानात वृद्धी होईल. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. प्रेमप्रसंगात आनंदी क्षण येतील. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱया विद्यार्थीवर्गाला मेहनत जास्त घ्यावी लागेल. जमिनीचे व्यवहार सध्या टाळलेले बरे. व्यापारी वर्गाला चांगल्या संधी मिळतील.
उपायः श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा
वृषभ
तब्येतीची अत्यंत काळजी घ्यावी लागेल. श्वसनाशी निगडित आजार त्रास देऊ शकतात. प्रवासाचा विचार सध्या टाळलेला बरा. कागदोपत्री व्यवहारात सावध राहावे. स्थावर मालमत्तेसंबंधी प्रश्न मार्गी लागतील. वाहन सुख मिळेल. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव असेल.
उपायः मंगळवारी महालक्ष्मीला कुंकुमार्चन करावे
मिथुन
कष्टाच्या मानाने परतावा कमी असला तरी पुढे जाऊन चांगल्या संधी प्राप्त होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. कुटुंबातील काही व्यक्तींच्या आडमुठय़ा धोरणामुळे वाद होण्याची शक्मयता आहे. प्रवासातून फायदा होऊ शकतो. अनपेक्षित लाभाचे योग होत आहेत. लव लाईफ उत्तम असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठचा त्रास होईल.
उपाय ः मारुतीच्या मंदिरात असोला नारळ वाहावा
कर्क
आरोग्याच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. आत्मविश्वासात किंचित कमी जाणवेल. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य प्राप्त होईल. वाहन खरेदीचे योग आहेत. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. शेअर बाजारापासून दूर राहा. नोकरदार वर्गाला पगारवाढ किंवा बढती मिळू शकते. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
उपाय ः ज्येष्ठ व्यक्तीला दूध दान द्यावे
सिंह
आरोग्य उत्तम असेल. इच्छापूर्तीचा काळ आहे. कामानिमित्त प्रवास घडू शकतो. जमिनीच्या व्यवहारात नुकसान होऊ शकते. मातृचिंता वाटेल. काही इन्व्हेस्टमेंट मधून चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो. नोकरी करणाऱयांना केलेल्या कष्टाचा योग्य परतावा मिळेल. गुप्त शत्रू तुमच्याबद्दल चुकीची माहिती सांगतील.
उपाय ः तांब्याचा तुकडा जवळ ठेवावा
कन्या
धनप्राप्तीच्या बाबतीत नशीबवान असाल. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न जरूर करावा. प्रवास कोणत्याही परिस्थितीत टाळण्याचा प्रयत्न करा. एखादी व्यक्ती नवीन स्कीमचा लोभ दाखवून फसवण्याचा प्रयत्न करेल, सावध रहावे. जमिनीच्या व्यवहारात चांगले यश मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. मित्रांकडून अपेक्षाभंग होईल.
उपाय ः कृष्ण मंदिरात पिवळे वस्त्र द्यावे
तूळ
तुम्हाला झालेला आरोग्याचा त्रास कमी होईल. स्वतःला वेळ देऊ शकाल. धनप्राप्ती कष्टाने साध्य होईल. कुटुंबात विनाकारण वाद होण्याची शक्मयता आहे. प्रवासाचे उत्तम योग आहेत. एखादी जागा किंवा प्लॉट विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल तर यश मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. फायदा होईल.
उपाय ःदीपदान करावे
वृश्चिक
अचानक आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. पूर्वी होऊन गेलेले आजार परत होण्याची शक्मयता आहे. वैद्यकीय उपचाराला वेळ लावू नये. धनप्राप्तीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. कुटुंबातील वातावरण चांगले असेल. धार्मिक कामासाठी प्रवास करू शकता. लेखी व्यवहारात यश मिळेल. नोकरदार वर्गाला सावध राहायची गरज आहे.
उपाय ः मंगळवारी मारुतीचे दर्शन घ्यावे
धनु
सर सलामात तो पगडी पचास हे विसरून चालणार नाही. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायची ही वेळ नाही हे लक्षात घ्या. कौटुंबिक समाधान आणि पाठिंबा चांगला मिळेल. पैशांची आवक उत्तम असेल. धोकादायक गुंतवणूक कोणत्याही परिस्थितीत करू नका. लव लाइफमध्ये प्रॉब्लेम येतील. नोकरदार वर्गाला चूक करून चालणार नाही.
उपाय ःगाईला चारा घालावा
मकर
तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. स्वतःच्या आवडीनिवडी जपायला वेळ मिळेल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू शकतात. कुटुंबातील व्यक्तींसोबत एखाद्या ठिकाणी सहलीला जाण्याची योजना आखाल. जमिनीचे व्यवहार शक्मयतो टाळावेत. शेअर बाजारापासून चार हात दूर राहिलेले बरे. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे.
उपाय ःलाल रंगाच्या गाईचे पूजन करावे
कुंभ
कामाच्याबाबतीत दिरंगाई किंवा आळशीपणा केला तर पश्चातापाची वेळ येऊ शकते. आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करा आणि स्वतःचा आणि इतरांचा फायदा करून घ्या. परिवारातील सदस्यांमध्ये एकमत होईल. प्रवासात धनहानी संभवते. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक होण्याचे योग आहेत. नोकरीत नको ते प्रसंग येऊ शकतात.
उपाय ःगरजूला छत्री दान द्या
मीन
वेगवेगळय़ा कारणांकरता खर्च करावा लागेल. व्यावसायिकांना पूर्वीच्या मानाने थोडी मंदी जाणवण्याची शक्मयता आहे. धोका पत्करून कुठल्याही योजनेत पैसे अडकवू नका, नुकसान होण्याची शक्मयता आहे. नोकरी करणाऱयांना नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळतील. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी कळेल.
उपाय ः जलचरांना खाणे घालावे





