लॉ ऑफ अॅट्रॅक्शन
आपली गंमत आहे. कोणतीही गोष्ट विदेशाकडून आपल्याकडे आली की, आपण त्या गोष्टीचा उदो उदो करतो. पण सत्य परिस्थिती ही असते की, कित्येक वर्षांपूर्वी भारतातूनच किंबहुना सनातन धर्मातूनच ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते. गेल्या कित्येक वर्षापासून पाश्चात्य, पूर्वेकडील देशांमध्ये जादूची छडी म्हणून ज्या गोष्टीकडे बघितले जाते, ती गोष्ट म्हणजे लॉ ऑफ अॅट्रॅक्शनसारख्या पुस्तकांमधून याची सुऊवात झाली. ज्योतिष शास्त्रामध्ये उपायांना अत्यंत महत्त्व आहे. किंबहुना ज्योतिष शास्त्र आणि उपाय यांना वेगळे बघितले जाऊच शकत नाही. काही लोक या वाक्मयाला प्रचंड विरोध करतील. ज्योतिष शास्त्राचा उद्देश ही केवळ घटना घडणार की नाही घडणार आणि घडणार असेल तर केव्हा घडणार, हाच आहे, असा त्यांचा दावा असतो. उपाय म्हणजे चमत्कार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे. पाऊस पडणे किंवा न पडणे हे आपल्या हातात नसते पण पाऊस पडत असेल तर छत्री उघडणे हे तरी किमान आपल्या हातामध्ये असतेच ना? उपाय हे छत्रीप्रमाणे आहेत. घडणारी घटना ते थांबवू शकत नाहीत तरी कमीत कमी नुकसान आणि मानसिक बळ वाढवण्याचे काम नक्कीच करतात. ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे ग्रहांचे उपाय आहेत, तोडगे आहेत, त्याप्रमाणे इतरही पद्धतीने उपाय करता येतात. ज्योतिषांनी केवळ शास्त्रात सांगितलेल्या उपायांना न सांगता आधुनिक विज्ञानाने मान्य केलेल्या काही इतर उपायांनाही अभ्यासले पाहिजे, हे माझे प्रांजळ मत आहे. लॉ ऑफ अॅट्रॅक्शन हा अशा उपायांपैकी एक आहे. या पद्धतीने जर वागले तर आपल्याला जे काही हवे, ते मिळू शकते. हो, तुम्ही बरोबर वाचले. ‘जो जे वांच्छील तो ते लाभो’ हे अगदी शक्मय आहे. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ?या भगवद्गीतेतील श्लोकातदेखील भगवान हेच म्हणतात. बायबलमध्ये जीजसचे एक वाक्मय आहे की, तुम्ही पूर्ण श्र्रद्धेने एखाद्या पर्वताला आज्ञा दिली की, या ठिकाणाहून त्या ठिकाणी जा, आणि यात तुम्हाला जराही शंका नसेल तर त्या पर्वताला हलावेच लागेल. कुराणात अल-बखरमध्येही अल्लाहने विश्वास आणि श्र्रद्धेचे महत्त्व सांगितले आहे. हे सगळे जे आहे, ते म्हणजेच लॉ ऑफ अॅट्रॅक्शन. एखादी घटना घडण्याकरता किंबहुना घडवण्याकरता विशिष्ट पद्धतीने केलेली मानसिक तयारी म्हणजेच लॉ ऑफ अॅट्रॅक्शन. याचा अगदी सोपा नियम आहे, सकारात्मक विचारशैलीने सकारात्मक घटना घडतात आणि नकारात्मक विचारसरणीने नकारात्मक घटना घडतात. म्हणजे आपली विचारशैली पुढे घडणाऱ्या घटनांना कारणीभूत असते.
(क्रमश:)
महाउपाय
मनावरील दडपण जाण्याकरता, अडलेली कामे पूर्ण होण्याकरता, अनामिक भीती दूर होण्याकरता तीन शनिवार सूर्यास्तानंतर मातीच्या भांड्यात गोडे तेल घेऊन त्यात आपला चेहरा पहावा आणि ते तेल माऊतीच्या मंदिरातील दिव्यामध्ये घालावे.
सोपी वास्तू टिप:
घरातील झाडू कधीही शनिवारी विकत घ्यावा, किंवा बदलावा. झाडू इतरांना नजरेला पडू नये, अशा ठिकाणी धरायची बाजू खाली करून ठेवावा.
मेष
धनप्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान असाल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात छोटेखानी समारंभ होईल. लेखी व्यवहारात सावध असावे. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होईल. संतती सुख उत्तम असेल. नोकरीत वरिष्ठांचा सहयोग मिळेल. कष्टाच्या मानाने परतावा कमी. प्रवासात त्रास संभवतो.
उपाय : मुंग्यांना साखर घालावी
वृषभ
आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतील. आत्मिक आनंद मिळेल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडू शकतात. नवीन एफडी कराल. दागिने खरेदीचे योग आहेत. संततीबद्दल चिंता वाटेल. वैवाहिक जोडीदाराशी छोट्या गोष्टींवरून भांडण होऊ शकते. प्रयत्न केल्यास सगळ्या प्रकारचे लाभ होतील.
उपाय : केशराचा टिळा कपाळी लावावा
मिथुन
आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी प्रयत्न कराल. आरोग्याची उत्तम साथ लाभेल. घरातील वातावरण हसरे असेल. समोरचा माणूस गैरफायदा उचलू शकतो. नोकरीतील राजकारणाचा कंटाळा येऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये चढ-उतार असेल. तीर्थक्षेत्राला भेट देण्याची इच्छा होईल.
उपाय : देशी गाईच्या पायाखालील माती पाण्यात सोडावी
कर्क
आर्थिक बाजू कमकुवत होऊ नये म्हणून कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. अचानक धनलाभाचे योग येतील. नोकरीमध्ये सहकार्मींमुळे त्रास संभवतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी. प्रसिद्धीचे योग आहेत. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मित्रांचा सहयोग मिळेल. खर्चाच्या प्रमाणावर लक्ष द्यावे.
उपाय : 5 कवड्या जवळ ठेवाव्यात
सिंह
एखादे काम होता होता राहू शकते. मन शांत ठेवा. एखाद्या ठिकाणी पैसे अडकण्याची शक्मयता आहे. कुटुंबात छोट्या गोष्टींवरून वाद संभवतात. प्रवासाचे उत्तम योग आहेत. जमिनीचे व्यवहार होतील. छोट्या गुंतवणुकीतून लाभ होतील. वैवाहिक जीवनात वाद संभवतात. नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत.
उपाय : दुर्गा चालीसाचा पाठ करावा
कन्या
विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी अपुरी राहू नये याची खबरदारी घ्यावी लागेल. नोकरीमध्ये अडचणीचा काळ आहे. धार्मिक अनुभूती येऊ शकते. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. नावलौकिक वाढण्याचे योग आहेत. दुरून उत्तम बातमी कळेल.
उपाय : गुरूवारी केळीच्या झाडाची पूजा करावी
तूळ
पूर्वी केलेल्या चुकांचा परतावा द्यावा लागू शकतो. कर्ज घेताना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. कौटुंबिक सुख उत्तम असेल. परिवारासोबत आनंदाने वेळ घालवाल. प्रवासाचे योग आहेत. शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून फायदा संभवतो. वैवाहिक जीवन समाधानी असेल.
उपाय : लहान मुलांना केशरी रंगाची मिठाई वाटावी
वृश्चिक
एखाद्याला दिलेला शब्द पाळणे अवघड जाईल. पूर्वी होऊन गेलेले आजार पुन्हा उद्भवू शकतात. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवाल. शेअर्स सारख्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. नोकरीत त्रास होऊ शकतो. जोडीदाराशी वाद होतील.
उपाय : मोहरीचे तेल लावलेली चपाती कुत्र्याला खायला घालावी
धनु
आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. त्वचेसंबंधी विकार उद्भवू शकतात. मनात असूनदेखील धनसंचय होणे अवघड असेल. कुटुंबातील वातावरणाला बिघडवणारी घटना घडू शकते. जमिनीसंबंधी व्यवहारात अडचणी येऊ शकतात. अचानक धनलाभ संभवतो.
उपाय : औदुंबराच्या झाडाला हळद घालून पाणी घालावे
मकर
इच्छापूर्तीचे योग बनत आहेत. आरोग्याविषयी सचेत असाल. धनप्राप्ती उत्तम असेल. कौटुंबिक सुख उत्तम असेल. प्रवास घडू शकतो. जमिनीचे व्यवहार तुर्तास टाळावेत. धोकादायक गुंतवणूक करू नये. नोकरीत वरिष्ठांचा त्रास संभवतो. कामाच्या ठिकाणी केलेले व्यवहार यशस्वी होतील. नावलौकिक वाढेल.
उपाय : छाया दान करावे
कुंभ
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. संततीकडून उत्तम समाचार प्राप्त होईल. नोकरीमध्ये ताण तणाव संभवतो. वाहन चालवताना सावध असणे गरजेचे आहे. दूरच्या प्रवासाचे योग बनत आहेत. व्यावसायिकदृष्ट्या उत्तम काळ आहे. संधीचे सोने करावे.
उपाय : पाण्यामध्ये लाल चंदन घालून सूर्याला अर्पण करावे
मीन
काही संधींची तुम्ही आतुरतेने वाट पहात होता, त्या संधी प्राप्त होतील. पोटाचे दुखणे येऊ शकते. वाहन सुख उत्तम असेल. जमिनीचे प्रŽ मार्गी लागतील. शेअर्ससारखी धोकादायक गुंतवणूक टाळावी. धनप्राप्ती उत्तम असेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. भाग्याची साथ आहे.
उपाय : गरजू व्यक्तीला गुळाचे दान द्यावे





