तेरे चेहरे में वो जादू है. . .
( मुख लक्षण/ PHYSIOGNOMY-चेहऱयावरून वरून माणसाचा स्वभाव आणि शक्मयता- भाग-2 )
कोणाचाही चेहरा हा अगदी तंतोतंत गोल किंवा लंबगोलाकृती असा नसतो. माणसाला पाहताक्षणी त्याच्या चेहऱयाची आकृती जशी आपल्याला दिसते तसा आकार आपण गृहीत धरला पाहिजे. मागच्या भागामध्ये गोलाकार आणि लंबगोलाकार चेहऱयाबद्दल चर्चा केली. या भागात चौकोनी आणि शंक्वाकृती (त्रिकोणी) चेहऱयाच्या माणसांचा स्वभाव कसा असतो, त्यांच्या सवयी कशा असतात इत्यादी गोष्टींची चर्चा करणार आहोत. जमलेच तर नाक आणि कान यांच्या आकारावरून व्यक्तिमत्त्वांमध्ये फरक कसा पडतो तेही पाहूया. चौकोनी चेहऱयाच्या आकाराच्या माणसांची खासियत म्हणजे अशी माणसे व्यवहारी असतात. रोमान्स, प्रेम, भावना अशा गोष्टींपासून काहीशी लांब, स्वतःच्याच भावना व्यक्त करताना अवघडणारी, बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘माझे सुख, माझे सुख हंडय़ा झुंबर टांगले, माझे दुःख माझे दुःख तळघरात कोंडले’ अशा काहीशा स्वभावाची असतात. आपल्या बायकोला किंवा प्रेयसीला प्रेम व्यक्त करतानासुद्धा ‘आता मी प्रेम करू का?’ असे विचारणारी ही माणसे असतात! व्यावहारिक असल्यामुळे आपल्या व्यवहारात अशी माणसे चुकत नाहीत आणि दुसऱयांनी चुकलेले त्यांना आवडत नाही. अशा व्यक्ती हुशार आणि विलक्षण प्रतिभेच्या धनीही असू शकतात. आपल्या बौद्धिक क्षमतेने मोठय़ा अडचणींवर मात करण्याची क्षमता यांच्यात असते. कोणतेही काम करत असताना योजनाबद्ध पद्धतीने करणे यांना आवडते. त्यांना टाप-टीप पसंत असते. स्वतः शिस्तप्रिय असल्याने घरातील इतर लोकांनी बेशिस्त वागलेले यांना चालत नाही. मित्रांबरोबर चहा प्यायला गेलेले असताना सुद्धा स्वतःचे बिल स्वतः देणार! सहसा यांना कोणी फसवू शकत नाही. पैसे साठवण्याकडे यांचा कल असतो. म्हणून काहीसे कंजूष असू शकतात. शंकू आकाराची म्हणजे त्रिकोणी, डोके मोठे आणि निमुळता चेहरा असलेल्या माणसांना संयम नावाचा प्रकार माहीत नसतो. ‘पी हळद आणि हो गोरी’ अशी त्यांची अपेक्षा असते. सगळय़ा कामात घाई गडबड करणे आणि त्यामुळे चुका करणे ही त्यांची खासियत असते. गंमत म्हणजे अशा माणसांच्या आयुष्यात घडणाऱया घटना उशिरा घडतात आणि त्यामुळे त्यांची चिडचिड होते. गडबड केल्याने हस्ताक्षर खराब असते, कोणतेही खास काम नसताना उगीचच गाडी वेगात मारणे अशा प्रकारामुळे लहान मोठे अपघात यांच्या आयुष्यात होत असतात. अशा व्यक्तींच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचे आकर्षणही असते. लहान सहान गोष्टींवर चिडणे अशा लोकांनी टाळले पाहिजे. अशा व्यक्ती प्रतिभाशालीही असतात. वाचकांच्या मनामध्ये आता प्रश्न आला असेल की समजा चेहरा गोल किंवा अंडाकृती किंवा आयताकृती, चौकोनी असा नसून काहीतरी मधला आहे, म्हणजे दोन किंवा जास्त आकृतींचे मिश्रण त्या चेहऱयात आहे, अशा वेळी काय अर्थ काढायचा? त्याचे उत्तर असे आहे की अशा चेहऱयांमध्ये त्या त्या आकृतीची वैशिष्टय़े कमी जास्त प्रमाणात एकत्र आलेली असतात. (क्रमशः)
महा उपायः कर्क राशीच्या लोकांनी दर अमावास्येला रुद्राभिषेक करावा. 250 ग्रॅम साखर तेथील भाविकांमध्ये वाटावी. शिवलीलामृताचा पाठ करावा. शक्यतो बुधवारी उपवास करावा
सोपी वास्तू टिपः लग्न जुळत नसलेल्या मुलींनी शक्यतो घराच्या वायव्येला झोपावे
मेष
एखाद्या मित्राच्या मदतीने व्यवसायात लाभ होऊ शकतो. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. धनलाभ उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्ती एकत्र येण्याचा आनंद घेतील. प्रवास शक्मयतो टाळावा. कागदोपत्री व्यवहारात सावध राहावे. शेअर्ससारखी धोकादायक गुंतवणूक करू नका. वैवाहिक जीवन उत्तम असेल. व्यावसायिकांना उत्तम काळ आहे. नोकरदार वर्गाने कामात चूक होऊ नये याची दक्षता घ्यावी. धार्मिक स्थळी भेट देण्याचे योग आहेत.
उपाय सोमवारी अन्नदान करावे
वृषभ
हवामानातील बदलामुळे तब्येतीच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे हितावह ठरेल. पैशांच्याबाबतीत एखाद्या माणसाकडून धोका होऊ शकतो, सावध रहा. कौटुंबिक जबाबदाऱया वाढतील. प्रवास घडेल. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. प्रॉपर्टी खरेदी विक्री करणाऱयांना अनुकूल वेळ आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. वाईट स्वप्ने पडू शकतात.
उपाय हनुमानाला बुंदीचा लाडू अर्पण करावा
मिथुन
येणाऱया काळामध्ये सगळय़ा प्रकारची संपन्नता प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पण कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबातील व्यक्तींच्या सहकार्याने धनप्राप्तीचे योग आहेत. प्रवास करताना सावध राहण्याची गरज आहे. तब्येत बिघडणे किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते. जमिनीचे व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. मंगल कार्य करता खर्च होईल.
उपाय हिरवे मूग दान द्यावे
कर्क
तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरा कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करू शकतो. कामाच्या ठिकाणी काही लोकांच्या वागण्याचा त्रास होईल. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्ती सहकार्य करतील. पाहुण्यांचे आगमन शक्मय आहे. प्रवासाची शक्मयता आहे. सही करताना विचार करून करा. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेम प्रकरणात फसवणूक होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला वरि÷ांचा त्रास संभवतो.
उपाय दुपारी दत्त दर्शन घ्यावे
सिंह
आरोग्याच्या दृष्टीने तितकासा अनुकूल काळ नाही. पथ्यपाणी सांभाळावे लागेल. एखाद्या जुन्या मित्राची मदत मिळून कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. कुटुंबातील वातावरण गढूळ होईल असे वर्तन एखाद्या व्यक्तीकडून घडू शकते. स्थावर मालमत्तेच्या दृष्टीने चांगली वेळ आहे. प्रेमप्रसंगात समाधान कारक घटना घडतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱयांनी जास्त मेहनत करावी.
उपाय गाईला चारा घालावा
कन्या
सगळय़ा दृष्टीने अनुकूल काळ आहे. ज्यांच्याकडून अपेक्षा नाही अशा लोकांकडून सहयोग मिळाल्याने आश्चर्य वाटू शकते. पैशांच्या बाबतीत मात्र सावध राहणे गरजेचे आहे. कुटुंबात लहान-मोठे भांडण झाल्याने मानसिक तणाव येऊ शकतो. कागदोपत्री व्यवहार करताना चूक होऊ नये याची खबरदारी घ्या. प्रेमसंबंधांमध्ये वाढ होईल. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला सगळय़ा बाजूने यश मिळेल.
उपाय मंदिरात फळे दान द्या
तूळ
आरोग्याच्या समस्या सुटल्यामुळे हलके वाटेल. या काळात तुमचा मूड चांगला असेल. मित्रांसोबत एखादी छोटी सहल आखाल. धनप्राप्तीचे नवे पर्याय सापडल्याने आनंद प्राप्त होईल. कौटुंबिक समाधान मिळेल. भावंडांचे सहकार्य प्राप्त होईल. शेजारी राहणाऱया व्यक्तीमुळे फायदा संभवतो. जमिनीच्या बाबतीतले व्यवहार सध्या टाळा. आईच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. गुंतवणूक करताना सावध राहा.
उपाय चादर दान द्यावी
वृश्चिक
डोकेदुखी किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो. दुसऱयांशी बोलताना योग्य शब्दांचा वापर करा. कुटुंबात थोडे मतभेद होण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीच्यादृष्टीने अनुकूल वेळ आहे. नोकरदार वर्गाला बोनस, इान्क्रिमेंट किंवा प्रमोशन मिळू शकते. छोटय़ा गुंतवणुकीकरता योग्य वेळ नाही. प्रेमसंबंधांमध्ये ताण तणावाची स्थिती येऊ शकते. वैवाहिक जोडीदारासोबत आऊटिंगला जाऊ शकाल.
उपाय सूर्याला अर्घ्य द्या
धनु
आरोग्याचा पाया मजबूत राहावा म्हणून विशेष प्रयत्न कराल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. तब्येत साथ देईल. धनप्राप्ती उत्तम असेल. घरातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. डॉक्मयुमेंटेशनमध्ये चुका होण्याची शक्मयता आहे. शेजाऱयांशी वाद संभवतो. प्रेमप्रकरणात ताणतणाव अनुभवाल. नोकरीत वरि÷ांचा त्रास होऊ शकतो. वैवाहिक सुख उत्तम असेल. नशिबाची साथ आहे.
उपाय पांढऱया गाईची सेवा करावी
मकर
तणावाचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. आर्थिकबाबतीत गाफिल राहून चालणार नाही. फसवणूक होऊ शकते. प्रवासाचे योग आहेत. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. शेजारी मदतीला येतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरदार वर्गाला वरि÷ांचे सहकार्य प्राप्त होईल.
उपाय अत्तराची बाटली जवळ ठेवावी
कुंभ
स्वभावामध्ये चंचलता येण्याची शक्मयता आहे. बेदरकार वागण्यावर अति लगाम घालणे आवश्यक ठरेल. पैशांच्या बाबतीमध्ये भाग्यवान असाल. कौटुंबिक सुख उत्तम मिळेल. पैसे साठवण्याकडे कल असेल. प्रवासातून फायदा होण्याची शक्मयता आहे. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. मातृ चिंतेचा काळ आहे. प्रतिस्पर्धी जिंकण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाने सावध राहावे.
उपाय केळीच्या झाडाची पूजा करावी
मीन
व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. कुटुंबातील व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाहीत. धनप्राप्ती कष्टाने होईल. फोनवर बोलताना किंवा मेल करताना योग्य शब्दांचा वापर करावा. गैरसमज होऊ शकतो. गुंतवणुकीतून अपेक्षेइतका फायदा होईल. नोकरदार वर्गाने वरि÷ांपासून चार हात लांब असावे. वैवाहिक जीवनात ताण तणाव संभवतो. मानसन्मानाची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत.
उपाय पांढरे फूल शंकराला अर्पावे





