पुनश्च ॐ
साडेसातीचा काळ हा वाईट नाही तर उत्कर्षाचा आणि प्रगतीचा असतो. उत्कर्ष म्हटला की संघर्ष हा आलाच. प्रयत्नांची पराकाष्ठा आलीच. पण म्हणून या कारणाकरता साडेसातीच वाईट असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. साडेसाती लग्न स्थानावरून, चन्द राशीवरून आणि आरूढ लग्नावरून सुद्धा पाहतात. म्हणजे प्रत्येकाचे 90% आयुष्य साडेसातीतच जाते!
आपल्या दशा (आपल्या आयुष्याच्या वेगवेगळय़ा कालखंडामध्ये वेगवेगळय़ा ग्रहांचा अमल असतो त्याला दशा म्हणतात) जर अनुकूल असतील तर साडेसाती चांगलीच फळ देते पण दशाच खराब असतील तर त्रास होणे नक्की.
काल 17-01-2023 ला संध्याकाळी 5.55 वा. शनिमहाराजांनी कुंभ राशीत प्रवेश केला. धनु राशीची साडेसाती संपली. मीनेची सुरू झाली. मिथुन आणि तूळ राशीची अडीचकी संपली, कर्क आणि वृश्चिक राशींची अडीचकी सुरू झाली. कुंभ ही शनीची स्वतःचीच आणि मूळ त्रिकोण म्हणजे आवडती रास आहे. मूळ पत्रिकेनुसार दशा चांगल्या असतील तर कुठल्याही राशीला कोणताही त्रास होणार नाही हे छातीठोकपणे सांगतो. कुठलीही शांती करायची गरज नाही. लक्षात घ्या, आयुष्यात घडणाऱया सगळय़ा चांगल्या घटना या मुख्यतः साडेसातीत घडतात. लग्न होणे, नोकरी मिळणे, प्रमोशन होणे, विदेश प्रयाण, संतती होणे यासारख्या घटना जर साडेसातीमध्ये होत असतील तर साडेसाती वाईट कशी?
काही ज्योतिषी सरसकट वाईट म्हणून संबोधतात. समोरच्या व्यक्तीचे वय किती, त्या वयात घडणाऱया घटना कोणत्या याचा सारासार विचार करणे आवश्यक नाही का? उदा. सत्तरी ओलांडल्यानंतर शुक्राची प्रणय पूरक दशा आली तर त्याचा फायदा काय? सगळय़ा राशींना साडेसातीचा वाईट परिणाम भोगावा लागतो हा दुसरा गैरसमज. एका राशीच्या सगळय़ा लोकांवर एकाच पद्धतीने साडेसातीचा परिणाम होतो हा तिसरा गैरसमज. कुंडली पाहताना मूळ लग्न कुंडली आणि चंद्रापासून इतर ग्रहांचे भ्रमण ज्याला गोचर म्हणतात हे दोन्ही पाहिले पाहिजे. साडेसाती हा शुद्धीकरणाचा काळ आहे.
शनिमहाराज हे एका जुन्या पिढीतील कोट घातलेले, हातात छडी असलेले मास्तर आहेत. त्यांना बेशिस्तपणा, आळशीपणा क्रूरपणा अजिबात चालत नाही. ते शिस्त लावतात आणि कामे करून घेतात. ‘छडी लागे छम छम’ हे त्याचे ब्रीद वाक्य आहे. ‘भोगा आणि मुक्त व्हा’ हे शनीचे घोषवाक्य आहे. शनिचे कार्य भव्य असते म्हणून त्याला वेळ लागतो. शनि म्हणजे दुःख, विलंब, अंधार, चिंता, मृत्यू, दुर्भाग्य वृद्धावस्था, चोरी, त्याग, संन्यास, दुःखात कुढणे, निरुत्साह असे वर्णन शास्त्रात असले तरी शनि म्हणजे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरचे मिळणारे यश, विचारपूर्वक काम केल्याने मिळणारी प्रसिद्धी, प्लॅनिंग करून काम केल्यामुळे चिरकाल टिकणारे भव्य यश हे देखील आहे. शनिमुळे काही त्रास होतच नाही असे माझे म्हणणे नाही पण सगळा त्रास शनिमुळेच होतो हे स़ाफ चुकीचे आहे. तीस वर्षानंतर शनिने आपल्या स्वतःच्या आणि आवडत्या कुंभ राशीमध्ये प्रवेश केला आहे. स्वतःच्या घरी आल्यानंतर तो सगळय़ांना दुःख का देईल?
आपल्याला माहिती आहे की आपल्या राशीच्या अगोदरच्या राशीमध्ये शनिचा जेव्हा प्रवेश होतो जेव्हा आपली साडेसाती सुरू होते आणि आपल्या राशीच्या पुढच्या राशीतून शनि गेल्यानंतर आपली साडेसाती संपते. एका राशीतून दुसऱया राशीत जाण्या करता शनिला अडीच वर्षे लागतात. 2.5 +2.5 +2.5 = 7.5 (साडेसात). पनवती किंवा अडीचकी म्हणजे आपल्या राशीपासून जेव्हा शनि चौथ्या किंवा आठव्या राशीत ती अडीच वर्ष.
भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत अनेकांची दुकाने या साडेसातीवर चालली आहेत. लोकांच्या डोक्मयात एकदा हा गैरसमज पक्का केला की शनिमुळेच सगळे वाईट घडते, मग कुठल्याही घटनेला शनिशी जोडले जाते. मग सुरू होतो शांती, जप इत्यादीचा खेळ. हे म्हणजे प्रत्यक्ष न्यायाधीशांना लाच देण्याचा प्रकार आहे. पुण्य बलवान असेल तर या काळात शुभ घटना घडतातच. पुण्याची व्याख्या काय? नॉनव्हेज न खाणे, उपवास करणे, देवाचे करणे म्हणजे पुण्य नव्हे. इतरांना पीडा न देणे, परोपकार करणे म्हणजे पुण्य.
अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् । परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ।।
मेष
या काळामध्ये तुमचा भर माहीत नसलेल्या गोष्टी समजून घेण्याकरता प्रयत्न करण्यावर असेल. अतिंद्रीय ज्ञानाची साथ मिळेल. तब्येतीला मात्र सांभाळावे लागेल. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बरेचशे निर्णय चुकण्याची शक्मयता आहे. प्रेम प्रकरणांमध्ये अपयशाचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना प्रयत्नांची पराका÷ा करावी लागेल. स्वभावामध्ये चिडचिडेपणा आणि आळस येईल. चेहऱयावर काळसरपणा येईल
वृषभ
वृषभवाल्यांना हा काळ अनुकूल असेल, सकारात्मक असेल. सध्या जे काम करत आहात त्यामध्ये विस्ताराची संभावना आहे. कामाचा व्याप वाढेल. सध्या करत असलेल्या व्यवसायाबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करा. या काळात मात्र चुकीच्या संगतीपासून दूर राहावे. संगतीमुळे व्यसनाधीनता होऊ नये याची काळजी घ्यावी. या काळात घर किंवा वाहन बदलण्याचे संकेत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये नको असलेली रिस्क घेऊ नका.
मिथुन
राशीला संमिश्र फळे मिळतील. काही व्यक्तींच्या चुकीच्या सल्ल्यामुळे एखाद्या प्रकरणामध्ये विनाकारण गोवले जाण्याची शक्मयता आहे. भावंडांमध्ये मतभेद होतील पण या मतभेदांना किती ताणवे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या हाताखाली काम करणाऱया लोकांना त्रास होण्याची शक्मयता आहे. सगळय़ा प्रकारचे गुप्त शत्रू नामोहरम होतील. त्यांच्या कारवाया बंद पडतील. वैवाहिक जीवनातील मतभेद कमी होतील
कर्क
या काळामध्ये काहीतरी भव्य दिव्य करावे, ज्याने समाजामध्ये नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळेल किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट हाती घ्यावा असे वाटण्याची शक्मयता आहे. पण कोणत्याही प्रकारची रिस्क या काळात घेणे योग्य ठरणार नाही. सगळय़ा प्रकारच्या अपघातापासून सावध रहावे लागेल. काम करत असताना आळशीपणामुळे कामात चुका होण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीसंबंधी वाद होऊ शकतात.
सिंह
अपेक्षित असलेले यश मिळवण्याकरता जास्त कष्ट करावे लागतील. बऱयाच वेळेला नैराश्याचा सामना करावा लागेल. धर्मावरील आस्था बऱयाच प्रमाणात कमी होण्याची शक्मयता आहे. मन विपरीत विचारांकडे वळेल. ज्यांना ब्लड प्रेशर किंवा इतर आजार आहेत त्यांनी मुख्यतः सावध राहण्याची आवश्यकता आहे. योग्य आहार विहार ठेवला तर समस्यांना दूर ठेवले जाऊ शकते. शत्रूंच्या कारवाया वाढतील
कन्या
हा कालावधी सुखद आणि समाधान देणारा असेल. आतापर्यंत तुम्हाला त्रास देणाऱया गुप्त शत्रूंचा नायनाट होईल. नोकरी करणाऱयांना चांगल्या वार्ता कळतील. गुंतवणुकीतून योग्य परतावा मिळू शकतो. उधारी वसूल होण्याचे योग होत आहेत. प्रगती म्हटली की कष्ट आले हे विसरू नका. एकंदर योग बघता काही निगेटिव्ह शक्तींच्या प्रभावाखाली येऊ शकता. ज्यांना परदेश गमनाची इच्छा आहे त्यांच्या इच्छा बऱयाच प्रमाणात पूर्ण होतील.
तुळ
तीस वर्षानंतर तुमच्या राशीला असा सुंदर योग होत आहे. छप्पर फाड योग असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पैसा भरपूर कमवाल पण वैयक्तिक आयुष्यामध्ये नको त्या घडामोडी घडण्याची शक्मयता नाकारता येत नाही. या काळात प्रणय संबंधांमध्ये वृद्धी होईल. पैसा कमावण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका नाहीतर नको ते प्रकरण अंगलट येऊ शकते. मोठय़ा भावंडांपासून आणि मित्रापासून लाभाची शक्मयता आहे. कौटुंबिक त्रास संभवतो
वृश्चिक
तुम्हाला जर असे वाटत असेल की आपले मोठे घर असावे, मोठे वाहन असावे तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील. अर्थात कष्टाला पर्याय नाही. आईच्या आरोग्याला सांभाळावे लागेल. जे लोक तुम्हाला आत्तापर्यंत त्रास देत होते त्यांच्यापासून सुटका मिळेल. या काळात कामाचा व्याप वाढण्याची शक्मयता आहे. कामांचा अतिरेक तब्येतीवर परिणाम करू शकतो. डोळय़ांच्या तक्रारी उद्भवू शकतात. याकरता योग्य ती काळजी घ्यावी. चेहरा काळवंडू शकतो.
धनु
येणारा काळ हा भरपूर मेहनत करून घेणारा काळ असेल हे ध्यानी ठेवा. दहा कामांकरता प्रयत्न केले तर त्यातील दोन कामे पूर्ण होतील हा हिशोब मनात पक्का असू द्या म्हणजे निराशा पदरी पडणार नाही. भावंडांमध्ये मतभेद होऊन भांडण विकोपाला जाण्याची शक्मयता आहे. ही भांडणे प्रॉपर्टीच्या संदर्भात किंवा भावनिक संघर्षामुळे होऊ शकतात. या काळात अंगात आळस भरेल. प्रेम प्रकरणात ब्रेकप होऊ शकते. धार्मिक यात्रा घडतील
मकर
मकर वाल्यांना घर बदल किंवा वाहनामध्ये बदल पहायला मिळेल. म्हणजे नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. सेकंड हॅन्ड घर किंवा वाहन अनुकूल ठरू शकते. या काळात जे कन्सल्टंट आहे त्यांना चांगल्या प्रकारचा फायदा होण्याची शक्मयता आहे. रिसर्च करण्याकरता किंवा नवीन गोष्टी शिकण्याकरता हा अनुकूल काळ असेल. काही गुप्त गोष्टी तुम्हाला कळतील ज्याचा भविष्यात फायदा होईल. तब्येत सुधारण्यासाठी सर्व ते प्रयत्न करा
कुंभ
या काळात तुमच्या अहंकाराला आणि ऍटीटय़ूडला सांभाळावे लागेल. जास्त मी पणा करायला जाल तर खाली आपटण्याची शक्मयता नाकारता येत नाही. दिवास्वप्ने बघण्यापेक्षा प्रॅक्टिकल राहणे शहाणपणाचे ठरेल. जमिनीसंबंधी वाद वाढण्याची शक्मयता आहे. वाहनाकरता खर्च करावा लागेल. वैवाहिक जीवनात ताण तणाव संभवतो. नोकरीकर्त्यांना हा काळ बराचसा अनुकूल असेल. वरि÷ वर्गाकडून कामाचे कौतुक होईल. नोकरीत प्रमोशन होईल.
मीन
मीन राशीच्या लोकांनी आळस झटकलाच पाहिजे. बेशिस्त वागाल तर शनी महाराज त्यांच्या पद्धतीने शिस्त लावून घेतील हे ध्यानी घ्या. कामे प्लॅनिंगपूर्वक वेळेवर पूर्ण करण्याकडे भर द्या. या काळात लांबचा प्रवास होऊ शकतो. कामे वाढतील. आर्थिकदृष्टय़ा काळ चांगला आहे. पण योग्य नियोजन करण्याकडे लक्ष द्या. या काळात कळत नकळत खोटे बोलण्याची सवय लागू शकते. वाणी दोष येऊ शकतो. कर्जमुक्ती होईल. धार्मिकपणा वाढेल





