सैफ अली खान अन् अमृता सिंहचा पुत्र इब्राहिम हा आता एका फेमस स्टार किडसोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे. इब्राहिमच्या आगामी चित्रपटासंबंधी माहिती समोर आली आहे. इब्राहिमने यापूर्वी ‘नादानियां’ या चित्रपटात श्रीदेवीची कन्या खूशी कपूरसोबत काम केले होते. इब्राहिम आता पुन्हा स्टारकिडसोबत दिसून येईल.
या चित्रपटात राशा थडानी मुख्य भूमिका साकारणार आहे. सध्या दोघेही रीडिंग सेशन अन् वर्कशॉप करत आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. सध्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार याची माहिती समोर आलेली नाही.
राशाने आझाद या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. याचबरोबर ती आता आणखी काही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर इब्राहिमचा सरजमीन हा चित्रपट 25 जुलै रोजी जियो हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.









