महेश बाबूच्या पुतण्यासोबत झळकणार
रविना टंडनची कन्या राशा थडानीने जानेवारी महिन्यात प्रदर्शित चित्रपट ‘आझाद’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगणचा पुतण्या अमन मुख्य भूमिकेत होता. ‘आझाद’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, परंतु चित्रपटातील राशावर चित्रित गाणे प्रचंड गाजले होते. राशा आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दिसून येणार आहे.
राशा लवकरच तेलगू चित्रपटात काम करणार आहे. महेश बाबूचा पुतण्या अणि दक्षिणेतील दिग्गज निर्माते रमेश बाबू यांचे पुत्र जयकृष्ण घट्टामनेनी याची नायिका म्हणून ती काम करणार आहे. महेश बाबूचा पुतण्या या चित्रपटाद्वारे तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय भूपति करणार आहेत. वैजयंती मूव्हीज आणि आनंदी आर्ट क्रिएशन बॅनर अंतर्गत जय कृष्णा आणि राशा थडानीच्या या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. ही एक यूथफूल लव्हस्टोरी असणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. राशा थडानी या चित्रपटासोबत ‘लाईके लाईका ’या चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच ती ‘पति-पत्नी और वो 2’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे.









