तब्बल चार किलो सातशे ग्रॅम वजनाचा मासा
सातारा प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील उरमोडी नदीत नुकत्याच झालेल्या पावसामध्ये दुर्मिळ आयआर फिश या प्रजातीचा मासा सोनगाव येथील तानाजी मालव यांना आढळून आला आहे. या माशाला औषध म्हणून मोठे महत्त्व असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान हा मासा तब्बल चार किलो सातशे ग्रॅम वजनाचा आहे असेही मानव यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याला निसर्गाचे कौदन लाभलेले आहे. कृष्णा, कोयना, उरमोडी, तारळी आदी नद्या या जिल्ह्यात आहेत पावसाळ्यात या नद्या दूथडी भरून वाहत असतात. पावसाळ्यात नदीला चढाचे मासे लागलेले असतात. जिल्ह्यामध्ये मासे वेगवेगळ्या प्रकारचे मिळून येतात परंतु दुर्मिळ आयआर फिश नावाचा मासा उरमोडी नदीपात्रात सोनगाव येथील तानाजी मालव या युवकाला बुधवारी आढळून आला आहे. या माशाचे वैशिष्ट्य औषधी म्हणून सांगितले जात आहे. हा मासा तब्बल चार किलो सातशे ग्रॅम चा असून या माशाला पाहण्यासाठी सोनगाव मध्ये गर्दी झाली होती.









