प्रतिनिधी / बेळगाव
रॅपिड ऍक्शन फोर्सची एक तुकडी शुक्रवारी बेळगावात दाखल झाली आहे. या तुकडीतील जवानांनी प्रमुख पोलीस स्थानकांना भेटी देऊन शहरात पथसंचलन केले.
मार्केट व खडेबाजार पोलीस स्थानकांना भेटी देऊन रॅपिड ऍक्शन फोर्सच्या अधिकाऱयांनी शहरातील प्रमुख घडामोडी, प्रमुख रस्ते व आस्थापनांविषयी माहिती घेतली. त्यानंतर चन्नम्मा सर्कलहून काकतीवेस, शनिवार खूट, खंजर गल्ली, दरबार गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली, चव्हाट गल्ली, खडेबाजार, भेंडीबाजार, पिंपळकट्टा, कांबळी खूट, मारुती गल्लीमार्गे समादेवी गल्लीपर्यंत पथसंचलन
केले. स्थानिक अधिकाऱयांनीही पथसंचलनात सहभाग घेतला होता.









