मजगाव, अनगोळ विभागांचा समावेश
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचे शक्तिप्रदर्शन सुरूच आहे. मिरवणूक मार्गांवरील पथसंचलनानंतर उद्यमबाग व टिळकवाडी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातही जलद कृती दलाच्या जवानांचे पथसंचलन झाले. रविवारी उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील मजगाव परिसरात जलद कृती दलाचे जवान व पोलिसांचे पथसंचलन झाले. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील अनगोळ परिसरात पथसंचलन करण्यात आले. यावेळी उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील, टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व इतर स्थानिक अधिकारी उपस्थित होते.









