पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग
बेळगाव : गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी शुक्रवारी मिरवणूक मार्गावर जलद कृती दलाच्या जवानांचे पुन्हा एकदा पथसंचलन झाले. या पथसंचलनात पोलीस अधिकाऱ्यांनीही भाग घेतला होता. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी, वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील आदींसह शहरातील इतर काही अधिकारी सहभागी झाले होते. शुक्रवारी सायंकाळी राणी चन्नम्मा चौक परिसरातून पथसंचलनाला सुरुवात झाली. मिरवणूक मार्गावरून जाऊन हे पथसंचलन शिवभवनजवळ पोहोचले. त्यावेळी पथसंचलनाचा समारोप झाला.









