मिरज :
मिरज तालुक्यातील एका गावात सहा वर्षाच्या बालिकेवर 60 वर्षाच्या वृध्दाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत नोंद असून, संशयीत अऊण पांडूरंग जाधव (वय 60) याला अटक करण्यात आली आहे. त्याला गुरूवारी सकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संशयीत अऊण जाधव याच्या घराजवळच पिडीत सहा वर्षाची बालिका राहण्यास होती. संशयीताने तिला घराकडे नेऊन लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बालिका रडत घरी गेली. तीने सर्व प्रकार आईला सांगितला. या घटनेने बालिकेचे पालक हादऊन गेले. पालकांनी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींना याची माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी संशयीत अऊण जाधव याच्यावर बाल लैगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.








