रणवीर कपूर आता अभिनयाच्या क्षेत्रातून दीर्घ ब्रेक घेणार आहे. सध्या तो पूर्ण वेळ मुलगी राहासोबत घालविणार आहे. आगामी काळात आलिया भट्ट ही स्वत:चा आगामी चित्रपट ‘जिगरा’च्या चित्रिकरणात व्यग्र राहणार असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. पुढील 5-6 महिने मी घरातच राहणार आहे. राहाच्या जन्मावेळी मी अॅनिमल या चित्रपटाचे चित्रिकरण करत होते. यामुळे मुलीसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालविता आला नव्हता. परंतु आता मला पालकत्वाची सुटी हवी आहे, कारण राहा आता व्यक्त होऊ लागली आहे. ती लोकांना ओळखू लागली असून शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करत आहे. हा तिच्या आसपास राहण्याचा सर्वात सुंदर वेळ असल्याचे रणवीरने म्हटले आहे. रणवीरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि पटकथा लेखनाची जबाबदारी संदीप रेड्डी वांगाने पार पाडली आहे. रणवीरसोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
Previous Articleकार्तिक माहात्म्य
Next Article केस कापून दान करण्याची घरोघरी मोहीम
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









