सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रणवीर अन् आलिया या दांपत्यापोटी मुलीने जन्म घेतला आहे. मुलीच्या जन्मानंतर कपूर परिवार अन् भट्ट परिवाराच्या आनंदाला उधाण आले आहे. रणवीर कपूर रविवारी पहाटेच पत्नी आलियाला घेऊन मुंबईतील एचएएन रिलायन्स रुग्णालयात पोहोचला होता. यानंतर काही वेळताच आलियाची आई सोनी राजदान तसेच सासू नीतू कपूर देखील रुग्णालयात दाखल झाली होती.
आलिया अन् रणवीर कपूरने परस्परांना 5 वर्षांपर्यंत डेट केले होते. या रिलेशनशिपनंतर दोघांनी एप्रिल महिन्यात विवाह केला होता. स्वतःच्या अपत्याच्या स्वागतासाठी तयारी करत असल्याचे रणवीरने यापूर्वी म्हटले होते.

मुलीला जन्म दिल्याची गूड न्यूज आलियाने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. यावर चाहत्यांसाठी बॉलिवूड कलाकारही कॉमेंट करत आहे. आलियाने एक पोस्ट शेअर केली असून यात सिंह-सिंहिण आणि बछडय़ाचे चित्र आहे. ‘आमच्या जीवनातील सर्वात उत्तम बातमी. आमचे अपत्य जन्मले आहे. ती सुंदर बाहुलीप्रमाणे दिसते. पालक होण्याचा आनंद जाणवू लागला आहे’ असे आलियाने या पोस्टमध्ये नमूद पेले आहे.
आलियाच्या या पोस्टवर अभिनेत्री मौनी रॉयने कॉमेंट केली आहे. रणवीर-आलियाचे अभिनंदन. तुमच्या प्रेमळ बाहुलीला माझ्याकडून ढीगभर पेम असे मौनीने म्हटले आहे. जोया अख्तर, नेहा धूपिया, श्वेता बच्चन, जान्हवी कपूर, अनन्या पांडे यांनीही दोघांचे अभिनंदन केले आहे.
मुलगी होण्यापेक्षा मोठा आनंद या जगात काहीच नसल्याचे अक्षय कुमारने नमूद केले आहे. कपिल शर्मा आणि अभिनेत्री सोनम कपूरने रणवीर अन् आलियाचे अभिनंदन केले आहे.









