तलावाभोवती एक ते दहा फेऱ्या मारल्या
या उपक्रमात ४७५ लोकांचा सहभाग
‘आरोग्यासाठी चाला’ उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष
कोल्हापूर
आरोग्यासाठी चाला’ हा संदेश देण्यासाठी आणि स्वच्छ व सुंदर रंकाळ्याच्या जनजागृतीसाठी आज कोल्हापूर वॉकर्सच्या वतीने आयोजित केलेल्या रंकाळा प्रदक्षिणा उपक्रमात ४७५ लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपल्या क्षमतेनुसार एक फेरीपासून दहा फेऱ्या मारल्या. लहान मुलापासून ८६ वर्षाच्या वृद्धांपर्यंत लोकांनी सहभाग नोंदवला.

कोल्हापूर वॉकर्स ३१ डिसेंबर रोजी रंकाळा प्रदक्षिणा उपक्रम आयोजित करतात. मोहीमेचे हे दहावे वर्षे होते. आज पहाटे चार वाजता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी व चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संजय शेटे यांच्या हस्ते उपक्रमास प्रारंभ झाला.
यावेळी आकाराम शिंदे, वसंत पाटील, बंडू माने ,महिपती संकपाळ,विलास तांबडे यांना गौरविण्यात आले.उपक्रमात सहभागी झालेल्याना प्रशस्तीपत्र देण्यात आली. वॉकर्सचे अध्यक्ष धोंडीराम चोपडे, अजित मोरे ,नाना गवळी, परशुराम नांदवडेकर,राजेश पाटील, बाळासाहेब भोगम,जितेंद्र डोर्ले आदींनी उपक्रमाचे आयोजन केले.हरिदास कालेकर, के.पी.शर्मा, कल्लापा पत्रावळे , इंद्रजीत बोंद्रे, अशोक देसाई, बाळासाहेब भोगम,राजू मालगावे,आडके यांचे उपक्रमास सहकार्य लाभले.
दहा फेऱ्या पूर्ण
रंकाळा प्रदक्षिणा उपक्रमाचे हे दहावे वर्षे होते.त्यानिमित्त धावपटू महिपती संकपाळ यांनी रंकाळ्यास दहा फेऱ्या ४५ किलोमीटर अंतर चालत पूर्ण केले. या फेरीमध्ये ५ वर्षांच्या शिवांश सावेकर या लहनग्याने रंकाळा तलावाला चालून एक फेरी पूर्ण केली. ८६ वर्षीय धावपटू आकाराम शिंदे यांच्यासह अनेक महिला उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.








