
कोल्हापूरचं वैभव असलेला रंकाळा तलाव पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेला पाहण्याचा आनंद काही औरच आहे. रंकाळा तलाव भरला हे नुसते कळलं तरी ही जनमाणसांच मन आनंदून जातं. गेल्या चार दिवसांपासून सुऊ राहिलेल्या संततधारेने काठावरून हाताला पाण्याचा स्पर्श होईल इतका तलाव भरला आहे. दुरदुरहून लोक भरलेला तलाव पाहण्यासाठी एकत्र येत आहेत. (छाया : शशिकांत मोरे)








