अभिजीत खांडेकर : तरूण भारत
मध्य प्रदेशने आज रणजी ट्रॉफीचे ( Ranji Trophy 2022 ) विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. बेंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ( N.Chinnaswamy ) झालेल्या अंतिम सामन्यामध्ये मध्यप्रदेशने (Madhya_Pradesh ) तब्बल ४१ वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईचा ( Mumbai ) ६ गडी राखून पराभव केला. रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईवर मध्य प्रदेशचा हा पहिलाच विजय आहे.
मागील 5 रणजी ट्रॉफीच्या हंगामामध्ये प्रथमच 4 नविन विजेते तयार झाले आहेत. यामध्ये यावर्षीचा मध्य प्रदेश तसेच सौराष्ट्र, विदर्भ आणि गुजरात या नविन विजेत्यांचा समावेश आहे.
बंगळूरमध्ये हजारो प्रेक्षकांसमोर, मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी त्यांचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना उचलून आनंद साजरा केला. विषेश म्हणजे, चंद्रकांत पंडित यांच्या नेतृत्वाखाली 1988-89 च्या मोसमात मध्य प्रदेशला पहिल्यांदाच अंतिम फेरीत नेले होते. परंतु बेंगळूरमध्येच त्यांना कर्नाटककडून पराभव पत्करावा लागला होता. 23 वर्षांनंतर, त्यांच्या प्रशिक्षणाखाली मध्य प्रदेशने विजेतेपद पटकावले.
सर्फराज खानच्या ( Sarfraj Khan ) शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्या. प्रत्यतरादाखल मध्य प्रदेशने 536 धावांचा डोंगर उभारत 162 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात मध्य प्रदेशकडून यश दुबे, रजत पाटीदार, आणि शुभम शर्मा यांनी शतके झळकावली.
पहिल्या डावात 161 धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबई दुस-या डावात मागे पडत राहिली. मुंबईवर झटपट धावा करण्याचे दडपण असल्याने विकेट पडू लागल्या.
6 व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वाल 1 धावांवर बाद झाल्यावर खालच्या फळीकडून फारसे योगदान मिळाले नाही. मध्य प्रदेशच्या कुमार कार्तिकेयने 4 विकेट्स घेतल्यामुळे मुंबईला 269 धावांत गुंडाळण्यात आले.
शेवटच्या दिवशी मुंबईने 108 धावांचे लक्ष्य मध्यप्रदेशसमोर ठेवले. मध्य प्रदेशने हे लक्ष्य ४ गड्यांच्या मोबदल्यात 29.5 षटकांतच पूर्ण केले. मध्य प्रदेशच्या या विजयाचे खरे शिल्पकार यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार ठरले आहेत. या तिघांनी संघाला पहिल्या डावात शतकी आघाडी मिळवून दिली.
रजत पाटीदार ( Rajat Patidar ) भारतीय क्रिकेटमधील एक उदयोन्मुख नाव म्हणून ओळखले जात आहे. पहिल्या डावात उल्लेखनिय 122 धावा काढणाऱ्या रजत पाटीदरने दुसऱ्या डावात 67 धावा काढून आपली चमक दाखवली. 5व्या दिवशी 108 धावांचा पाठलाग करणाऱ्या मध्यप्रदेशने 4 विकेट गमावल्या. परंतु रजत पाटीदारच्य़ा नैसर्गिक आणि संयमी खेळीने विजय खेचून आणत प्रेक्षकांना वेड लावले.
मुंबईच्या शेवटच्या डावाच्या दिवशी मध्यप्रदेशच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत मुंबईला 259 धावांत गुंडाळले. सगळ्यांच्या मजरा खिळून राहिलेल्या कुमार कार्तिकेय ( Kumar Kartikey) याने आपल्या भेदक माऱ्याने ४ बळी टिपून मुंबईचे कंबरडे मोडले.
मुंबईच्या कर्णधार पृथ्वी शॉनेने हार्दिक तामोरेसह 2 बाद 113 धावसंख्येवरून शेवटच्या दिवसाला सुरुवात केली. झटपट धावा काढण्याच्या नादात त्यांनी विकेट्स गमावल्या. त्यानंतर ती जबाबदारी अरमान जाफर आणि सुवेद पारकर यांच्यावर पडली आणि दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात केली.
पहिल्या डावात 161 धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबई दुस-या डावात मागे पडत राहिली. मुंबईवर झटपट धावा करण्याचे दडपण असल्याने विकेट पडू लागल्या. कुमार कार्तिकेयने ४ बळी घेत मुंबईचे कंबरडे मोडले.
दुसऱ्या डावात मुंबईच्या फलंदाजांनी कूच खाल्ली. मोठी आणि झटपट धावसंख्या उभी करण्यच्या नादात मुंबईचा संपूर्ण संघ 269 धावांत गारद झाला. सुवेध पारकरने जलद 51 धावा ठोकल्या तर त्याच्या जोडीला सरफराज खानने 45 चेंडूत 48 धावा काढल्या.
मुंबईने शेवटच्या दिवशी 108 धावांचे लक्ष्य मध्यप्रदेशसमोर ठेवले. मध्य प्रदेशचा सलामीवीर आणि पहिल्या डावात शतक ठोकणारा यश दुबे 1 धावांवर माघारी परतला. तरीही, हिमांशू मंत्री आणि शुभमन शर्मा यांनी अनुक्रमे 37 आणि 30 धावा ठोकून संघाला विजयाच्या जवळ नेले.
पहिल्या डावात 113 धावा करणाऱ्या शुभम शर्माने नसता मोह केला. 7 धावांची गरज असताना विनींग शॉट खेळण्याच्या नादात त्याने आपली विकेट टाकून दिली. पण पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या रजत पाटीदारने विनींग शॉट खेळून हे काम पुर्ण केले.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईच्या सर्फराज खानने या हंगामात 982 धावांचा पाऊस पाडला. ज्यामध्ये त्याच्या 4 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.