वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मनोरंजन क्षेत्रासाठी पुन्हा एक धक्कादायक वृत्त आहे. लोकप्रिय पंजाबी गायक रणजीत सिद्धू यांचा मृतदेह गेल्या शुक्रवारी रात्री उशीरा रेल्वेलाईनवर आढळून आला आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता शुक्रवारीच संध्याकाळी व्यक्त करण्यात आली होती. आता मृतदेह सापडल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांची हत्या करण्यात आली असावी काय, अशीही शंका उपस्थित करण्यात येत असून या शक्यतेचीही चौकशी केली जाईल अशी माहिती पंजाब आणि दिल्ली पोलिसांनी दिली आहे.









