25 ते 30 वर्षांपासून ‘तरुण भारत’मधील पु25 ते 30 वर्षांपासून ‘तरुण भारत’मधील पुरवण्याचा संग्रह : माहितीचा उपयोग पुढील पिढीसाठी व्हावा हा उद्देशरवण्याचा संग्रह : माहितीचा उपयोग पुढील पिढीसाठी व्हावा हा उद्देश

आवड…
- रणजित धामणकर पेशाने इंजिनिअर
- लहानपणापासून वाचनाची आवड
- कन्नड माध्यमातून शिक्षण घेऊनही मराठीची गोडी
- ‘तरुण भारत’च्या सर्वच पुरवण्यांचा केला संग्रह
प्रतिनिधी /बेळगाव
प्रत्येकाला कोणता ना कोणता एक तरी छंद असतोच. आवड जोपासताना यातून एक नवीन कलाकृती जन्म घेत असते. टिळकवाडी येथे राहणाऱया रणजित धामणकर यांनी मागील 25 ते 30 वर्षांपासून ‘तरुण भारत’मधील पुरवण्याचा संग्रह केला आहे. काही माहिती ही वर्षांनुवर्षे महत्त्वाची असून या माहितीचा उपयोग पुढील पिढीसाठी व्हावा, या उद्देशाने त्यांनी हा संग्रह केला आहे.
रणजित धामणकर हे पेशाने इंजिनिअर असून लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड आहे. कन्नड माध्यमातून शिक्षण घेऊनही घरी मराठी वातावरण असल्याने त्यांनी मराठी वाचण्यास सुरुवात केली. ‘तरुण भारत’ दररोज घरी येत असल्याने त्यांनी लहान-लहान बातम्यांपासून सुरुवात करत मराठी वाचन सुरू केले. ही वाचण्याची आवड पुढील काळात त्यांचा छंद बनला.
खजाना म्हणजे माहितीचे भांडार
‘तरुण भारत’ने वाचकांसाठी नवनवीन सदर, पुरवण्या सुरू केल्या. यातील 1991 साली सुरू करण्यात आलेल्या खजानाने वाचकांपर्यंत नवीन माहिती पोहोचविली. ही माहिती आपल्याकडे कायमस्वरुपी रहावी म्हणून धामणकर यांनी संग्रह करण्यास सुरुवात केली. 1991 ते 1999 पर्यंतच्या सर्व खजाना पुरवण्या त्यांच्याजवळ होत्या. परंतु नवीन घरात स्थलांतर होताना त्या गहाळ झाल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा संग्रह करण्यास सुरुवात केली. त्यामुळे 1999 पासून आजतागायत सर्व पुरवण्या त्यांनी जपून ठेवल्या आहेत.
केवळ खजानाच नाही तर घरकुल, धन्वंतरी, आध्यात्मिक माहिती देणारे अनेक लेख त्यांनी जपून ठेवले आहेत. तरुण भारतमुळे वाचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे कोणतेही नवीन सदर असो ते आपल्याकडे जपून ठेवायचे, ही सवय लागली. आरती संग्रह, गणेश दर्शनाच्या पुरवण्या या देखील जपून ठेवल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
वृत्तपत्राची विश्वासार्हता कायम
आज डिजिटल युग असल्याने कोणतीही घटना घडली की काही क्षणात प्रत्येकाच्या मोबाईलवर येते. परंतु व्हॉट्सऍपवर येणारी बातमी अथवा माहिती कितपत खरी असते, हे विचार करायला लावणारे आहे. त्यामुळे जोवर ती बातमी वृत्तपत्रातून छापून येत नाही, तोवर आजही विश्वासार्ह समजली जात नाही. त्यात तरुण भारतसारखे वृतपत्र मागील शंभर वर्षांपासून विश्वासार्ह बातमीदारी करीत असल्याचे गौरवोद्गार रणजित धामणकर यांनी काढले.









