वैभवी मर्चंट करणार दिग्दर्शन
राणी मुखर्जी अलिकडेच मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. अभिनेत्रीने आता स्वत:च्या आगामी चित्रपटाची तयारी चालविली आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि राणी मुखर्जीची मैत्रिण वैभवी मर्चंट करणार आहे. या चित्रपटाच्या कहाणीबद्दल कुठलीच माहिती अद्याप समोर आलेले नाही. तसेच या चित्रपटातील अन्य कलाकारांची नावेही उघड झालेली नाहीत.
मागील काही काळापासून राणीच्या ‘मर्दानी 3’ या चित्रपटाची चर्चा सुरू होती. मागील दोन चित्रपटांमध्ये राणीने शिवानी शिवाजी राव नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ही व्यक्तिरेखा पुन्हा साकारण्याची माझी इच्छा आहे, परंतु सर्वकाही कहाणीवर अवलंबून आहे. उत्तम कहाणी मिळाल्यास निश्चितच या चित्रपटात सहभागी होऊ इच्छिते असे राणीने म्हटले होते.









