वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शुक्रवारी रंगांची उधळण करत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारीहाळ आदी भागामध्ये सकाळपासूनच रंगपंचमीची लगबग सुरू होती. युवक वर्ग गटागटाने फिरत एकमेकांना रंग लावत होते तर बालचमुही रंग उधळण्यात मग्न असल्याचे पहावयास मिळत होते. अनेक ठिकाणी पाण्याचे फवारे सोडण्यात आले होते. काही ठिकाणी गाण्यांच्या तालावर तऊणाई थिरकताना दिसत होती. दुपारी बारा वाजता गावोगावी पारंपरिकरित्या होळीचे दहन करण्यात आले. एकंदरीत पूर्व भागामध्ये होळी व रंगपंचमी शांततेत साजरी करण्यात आली.









