वार्ताहर/येळ्ळूर
सुळगे (ये.) येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. गावच्या देवस्थान कमिटीने देववाजप लावून गावातील सर्व देवदेवतांना शिंपण व पूजन केले. सकाळी 9 वाजता गावातून तुतार व रणहालकीसह रंगाची उधळण करीत फेरी काढण्यात येवून रंगपंचमीचा आनंद लुटण्यात आला. गावातील विविध संघटनांनी डीजे व पाण्याच्या शॉवरची सोय करून संगीताच्या तालावर आबालवृद्धांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.









