प्रतिनिधी /फोंडा
हायपर रिएलिस्टींक रांगोळी साकारून देशभरातून वाहव्वा मिळविलेला कवळे फेंडा येथील युवा रांगोळी कलाकार आकाश नाईक यांच्या ‘रंकाश’ रांगोळी वर्गाच्या विद्यार्थ्यांतर्फे रांगोळी प्रदर्शन मंगळवार 4 ऑक्टो. रोजी 6 वा. साईनगर फोंडा येथील ग्रॅन्ड सेलेब्रेशन सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
रांगोळी प्रदर्शन बुधवार 5 ऑक्टोपर्यंत खुले राहणार असून युवा रांगोळी बालकलाकार व रिएलिस्टींक रांगोळी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कलाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन आकाश नाईक यांनी केले आहे.









