सिंगापूर बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये माता-लेकीचे नाव
रांगोळी अत्यंत कठिण कलाकृतींपैकी एक आहे. परंतु एका महिलेने आणि तिच्या मुलीने 26,000 आइस्क्रीम स्टिकचा वापर करत मोठय़ा आकाराची रांगोळी कलाकृती तयार करत सिंगापूर बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये स्वतःचे नाव नोंदविले ओ. या रांगोळीत उल्लेखनीय तमिळ विद्वान आणि कवींना रेखाटण्यात आले आहे.
सुधा रवि यांनी स्वतःची कन्या रक्षिता यांच्यासोबत लिटिल इंडियात आयोजित पोंगल सोहळय़ामधील एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान रांगोळी सादर केली ओ. सुधा रवि यांना यापूर्वी 2016 मध्ये 3,200 चौरस फूट आकाराची रांगोळी काढण्यासाठी रिकॉर्ड बुकमध्ये स्थान मिळाले होते.

पोंगल सोहळय़ासाठी रांगोळी तयार करण्यासाठी त्यांना एक महिन्याचा कालावधी लागला आहे. यात प्रसिद्ध तमिळ विद्वान-कवी म्हणजेच तिरुवल्लुवर, अव्वैयार, भारथियार आणि भारतीदास यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. वायोलिन आणि मृदंगमच्या कलाकारांनी कर्नाटक संगीत आणि कविंच्या कार्याचे कौतुक करत गीतांसह उपस्थितांचे मनोरंजन केले.
सुधा रवि आणि त्यांची मुलगी सिंगापूरमध्ये तमिळ सांस्कृतिक कार्यक्रमांचा हिस्सा आहेत, युवा पिढी आमच्या परंपरा पुढे नेतील असा संदेश यातून मिळत असल्याचे उद्गार तमिळ भाषा आणि संस्कृती संघाचे पदाधिकारी वैरावन यांनी म्हटले आहे.









