प्रतिनिधी/ बेळगाव
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगाव महानगरतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त ‘रंग दे बसंती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हुबळी येथील सामाजिक कार्यकर्ते किरण रामा उपस्थित होते.
व्हीटीयूमधून डॉक्टरेट मिळविल्याबद्दल उद्योजक सचिन सबनीस यांचा सत्कार करण्यात आला. किरण रामा यांनी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या संघर्षाबद्दल तरुणांना माहिती दिली. देशाची ताकद ही तरुणाईमध्ये असून त्यांना योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानिमित्त देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अभाविपचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकसिंग राजपूत, विभागप्रमुख डॉ. एच. एम. चन्नापगोळ, डॉ. आनंद होसूर, प्रविण पी., प्रकाश कामते, राजू अंगडी, शहर सचिव प्रितम हुपरी यासह विद्यार्थी उपस्थित होते.









