वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताचा डेव्हिस चषक टेनिसपटू रामनाथन रामकुमारने पिछाडीवरून मुसंडी मारत अग्रमानांकित लुका नार्दीला पराभवाचा धक्का बेंगळूर ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
या स्पर्धेत वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या रामकुमारने इटलीच्या नार्दीवर 1-6, 6-4, 6-4 अशी मात केली. सुमारे दोन तास ही झुंज रंगली होती. पहिला सेट नार्दीने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये रामकुमारने जोरदार मुसंडी मारत बरोबरी साधली आणि हाच जोम कायम ठेवत निर्णायक तिसरा सेट जिंकून नार्दीचे आव्हान संपुष्टात आणले. अन्य एका सामन्यात चौथ्या मानांकित फ्रान्सच्या बेंजामिन बॉन्झीला पोलंडच्या मॅक्स कॅसनिकोवस्कीकडून 3-6, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. रोका बटालाने ट्रिस्टन बॉयरचा 7-5, 6-3 असा पराभव केला.









