वृत्तसंस्था/ केंटुस्काय
भारताच्या रामकुमार रामनाथन आणि अनिरुद्ध चंद्रशेखर यांनी येथे झालेल्या लेक्झिंग्टन खुल्या 2025 च्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील झालेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रामकुमार आणि अनिरुद्ध या जोडीने चीन तैपेईच्या हेसु आणि हुआंग यांचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना 70 मिनिटे चालला होता. रामकुमार रामनाथनचे एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील हे दुहेरीतील आकरावे विजेतेपद आहे. रामकुमार आणि अनिरुद्ध या जोडीने चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेत आठ वेळेला दुहेरीचे अजिंक्यपद मिळविले आहे.









