खानापूर तालुक्यातील रामगुरवाडीत राजकीय व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
२०२३ सालच्या निवडणुकी दरम्यान रामगुरवाडीच्या ग्रामस्थांनी हा आगळा-वेगळा निर्णय घेतला आहे. गावामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदी करण्यात आली असून कोणत्याही प्रकारचे राजकीय सम्मेलनांचे आयोजन करण्यास सक्त मनाई केल्याचे नमूद एका फलकात करण्यात आले आहे. आमच्या गावात २ महिन्यांच्या आत रस्त्याचा विकास करा मगच तुम्हाला गावात प्रवेश करता येईल असा इशारा ग्रामस्थ, पंच मंडळी व पंचायत सदस्यांच्या वतीने देण्यात आला आहे .









