वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या मुंबईतील नेव्ही हाफ मॅरेथॉनचे जेतेपद मिळविणारा धावपटू रामेश्वर मुंजाळ उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर आता 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
मुंबईतील ही हाफ मॅरेथॉन स्पर्धा इंडियन ऑईल नेव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आली होती. या मॅरेथॉनवेळी 27 वर्षीय रामेश्वर मुंजाळची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. त्याच्या मुत्रलनमुन्यामध्ये निर्बंध घातलेले द्रव आढल्याचे विश्व उत्तेजक विरोधी एजन्सीने म्हटले आहे. मुंजाळकडून हा अशा तऱ्हेचा पहिलाच गुन्हा झाला असल्याने त्याच्यावर बंदीचा कालावधी अधिक लागण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आले. मुंजाळच्या बंदी कालावधीला 14 एप्रिल 2025 पासून प्रारंभ झाला असून आता तो 14 एप्रिल 2030 पर्यंत कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.









