ओटवणे प्रतिनिधी
चराठा टेंबवाडी येथील रहिवासी रमेश गंगाराम बोंद्रे (८२) यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.रमेश बोंद्रे यांनी सावंतवाडी मच्छी मार्केट नजीक येथील आपल्या साईप्रसाद स्टोअर्स मधून ग्राहकांना सेवा दिली. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, दोन मुली, बहिणी, सुना, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. चराठा माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर उर्फ बंड्या बोंद्रे तसेच सावंतवाडी मच्छी मार्केट येथील साईप्रसाद स्टोअर्सचे मालक गंगाराम उर्फ आबा बोंद्रे तसेच मळगाव येथील श्री कृपा ऍग्रो प्रॉडक्ट्सचे मालक परेश बोंद्रे यांचे ते वडील होत.









