Ramdas Athawale मुस्लिम आणि ख्रिश्चनांमधल्या दलितांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समित्यांच्या अहवालानंतर त्यांना त्यांना अनुसुचित जातींचा (SC) दर्जा देण्याचा विचार करील असे वक्तव्य केंद्रिय मंत्री रामदास आठवले ( Minister Ramdas Athawale) य़ांनी केलं आहे. ते आज को केरळ दोऱ्यावर असून ते कोचीमधून बोलत होते. देशातील दलित ख्रिश्चन आणि दलित मुस्लिमांना दलित दर्जा देण्याच्या मुद्द्याचे परीक्षण करण्यासाठी सरकारने या समित्यांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे. त्यानंतर केंद्रिय मंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे.
आपल्या कोची दौऱ्यात बोचताना ते म्हणाले, “आतापर्यंत 80 टक्के मुस्लिम समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळत आहे. आमच्या मंत्रालयाने दलित ख्रिश्चन आणि दलित मुस्लिमांचा अभ्यास करण्यासाठी बालकृष्णन समिती नेमली आहे. तसेच, केंद्र सरकारकडून निर्णय येण्यासाठी या आयोगांना अहवाल तयार करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे,” असे आठवले म्हणाले.
आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ओबीसींच्या वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी रोहिणी समितीच्या नियुक्तीचा उल्लेखही केला. “आम्ही ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देण्यासाठी रोहिणी समिती नेमली आहे. जी ओबीसींच्या वर्गीकरणाचाही अभ्यास करत आहे. अहवाल आल्यानंतर आमचे मंत्रालय त्याच्या वर्गीकरणाबद्दल विचार करेल,” असे ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









