राम कथा म्हणजे संस्कारांचा वारसा जपायला लावणारी कथा. संस्कारांचीसुद्धा वाण जपायला लावते कारण एकूणच मनुष्यप्राणी वाण वाटण्यात हुशार. वाईट गोष्टी लोकांना सांगत बसतात परंतु चांगलं मात्र सांगायचं विसरून जातात. रामाचे संस्कार मर्यादापुऊषोत्तम राम म्हणून आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत पण माणूस मोठा लबाड देव जरी साक्षात त्याच्यासाठी इथे आला तरी तो देवालाच देवळात बंदिस्त करून ठेवतो आणि स्वत: मात्र बाहेर हिंडत राहतो. म्हणूनच अशा या मर्यादा पुऊषोत्तम रामाची कथा पाहिल्यास रामायणमध्ये राम जन्मानंतर रामाचं बालपण तुलसीदासांनी फार सुंदर रंगवले. वाल्मिकी रानात मात्र त्याचा अभाव दिसतो.
आठव्या वषी गुऊगृही गेल्यानंतर सर्व प्रकारच्या कलांमध्ये निपुण झालेला राम आता ऋषीमुनींबरोबर देशाटन करायला निघाला आणि त्याचवेळी त्याच्या मनात प्रŽ निर्माण झाला की माझ्या जगण्याचं प्रयोजन नेमकं काय. या सृष्टीने या विश्वाने इतकं सारं मला भरभरून दिलं. मी त्यांना परत काय दिलं पाहिजे, असा विचार सतत त्यांच्या मनात येऊ लागला. शस्त्रास्त्रांचे संवाद आणि उपसंहार शिकून त्याचे नेमके उपयोग मानवी कल्याणासाठी किंवा सृष्टी संवर्धनासाठी कसे केले पाहिजे याचे नेमके प्रशिक्षण गुऊकुलांमधून रामाला मिळालं. अस्त्रशस्त्र नुसती शिकून चालत नाहीत तर ती योग्य ठिकाणी वापरून ती योग्यवेळी नियंत्रणात ठेवावी लागतात. प्रत्येकाचं जगणं हे स्वांत सुखाय असण्यापेक्षा राष्ट्र कार्याचं असावं याच प्रशिक्षण रामाला गुऊकुलांमध्ये आणि पुढे वनवासाच्या काळातसुद्धा मिळालं. रामायणात झालेले युद्ध हे लोक कल्याणासाठीचं होतं.
मानवतेसाठी झालेले युद्ध यावेळी रामाने योग्य युद्धनीती वापरून कमीत कमी जीवित हानी होईल, याचा विचार सतत केला आहे. राक्षसांना वैष्णव धर्म शिकवणारा राम त्यांच्यात परिवर्तन करूनच परत आला. बिभीषणाला राज्य देऊन कोणत्याही प्रकारचा मोह न ठेवता राम परत अयोध्येला आले. अशा या रावणवधाच्या वेळी झालेल्या युद्धात रामाने रावणाला ठार मारलेच. यावेळी ही बातमी सगळ्या लंकेला अतिशय दु:खद होती. हजारो राक्षस वीर मरून पडले होते आणि राक्षसांचा राजासुद्धा नाहीसा झाला होता. अशावेळी ही बातमी रावणाच्या अंतरात म्हणजेच राणी मंदोदरीच्या कक्षात येऊन पोहोचली. त्रिखंडावर विजय मिळवणारा रावण नक्की जिंकणार याची खात्री तिला होतीच म्हणूनच मंदोदरी रावणाच्या विजयाविषयी आश्वस्त होती.
अशातच रावण वधाची बातमी आली, नगरीतील सर्व लोकांनी आपली छाती बडवून रडण्यास सुऊवात केली. मंदोदरी धावत युद्ध भूमीकडे निघाली. रथाजवळच अस्ताव्यस्त पडलेला रावण बघून तिने टाहो फोडला पण शेवटी काही वेळाने वास्तव स्वीकारून ती शांतपणे उभी राहिली आणि एकाएकी रामाच्या तंबूकडे चालायला लागली. राम तेथील जवळच एका दगडावरती पाठमोरे बसलेले होते. एका स्त्रीची सावली आपल्याजवळ येतेय हे बघून ते भरभर उठले आणि नम्रतेने नमस्कार करून मंदोदरीसमोर उभे राहिले. माते आपण कोण आहात? कशासाठी आला आहात? मी काही तुमची मदत करू का? असे विचारल्यावर मंदोदरीने तर ताबडतोब उत्तर दिलं, मी इथे रावण गेलाय याची खात्री करून घ्यायला आले होते. कारण कधीही न हरणारा रावण आज मृत्यू कसा काय पावला? आणि असा कोण शूर योद्धा आहे जो रावणाला मारू शकतो? ते बघण्यासाठी मी इथे आले, पण मला न विचारताच उत्तर मिळाले. परस्त्रीची सावली पाहिल्यानंतर जो राम आदबीने उभा राहतो आणि मदतीसाठी हात पुढे करतो. तो रावणापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. तुझ्या मनातील स्त्री बद्दलचे आदरभाव आणि रावणाची स्त्रीलोलूपता यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आज मला कळलं तुला मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात ते.








