सावंतवाडी
नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॅन्डबॉल क्रीडा स्पर्धेसाठी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा या शाळेचा विद्यार्थी रामचंद्र पांडुरंग सौंदेकर याची१९ वर्षाखालील गटामध्ये निवड झाली आहे. तर १९ वर्षाखालील मुलींच्या हँडबॉल स्पर्धेसाठी याच शाळेतील स्नेहा शत्रुघ्न तुळसकर हिची निवड झाली आहे. या स्पर्धा नाशिक येथे ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केल्या आहेत. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर यांनी खेमराज इंग्लिश स्कूल बांदा या शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविले आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकांनी व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Previous Articleमळगावात १२ ते १४ रोजी किल्ले व ऐतिहासिक वस्तु प्रदर्शन
Next Article सायबर गुन्हे कमी होणे ही काळाची गरज – SP सौरभअग्रवाल









