विलवडे गावचे सुपुत्र आबा दळवी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र उर्फ आबा धर्माजी दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची नविन कार्यकारणी सोमवारी जाहिर करण्यात आली.मूळचे विलवडे येथील आबा दळवी आपल्या उद्योग व्यवसायानिमित्त नवी मुंबईत स्थायिक असून दळवी यांचे घराणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. दळवी यांचे वडील कै धर्माजी दळवी यांनीही काँग्रेस पक्षात महत्त्वाची पदे भूषविली. आबा दळवी हे काँग्रेसचे तथा विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आहेत. आबा दळवी सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी असून यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरीपदही भूषविले होते.
नवी मुंबई जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तसेच पक्षात अनेक महत्त्वाच्या पदावर काम करून काँग्रेस वाढीसाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. तसेच विविध उपक्रमातून त्यांनी काँगेसचे कार्यकर्ते घडविले. पक्ष संघटनेतील त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. नवी मुंबई व विलवडे परिसराच्या शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा, धार्मिक कार्यातआबा दळवी नेहमी अग्रस्थानी असतात.सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांनी अनेक समाजपयोगी उपक्रमांना तसेच गोरगरीबांना वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. आबा दळवी यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
ओटवणे प्रतिनिधी









