वेंगुर्ले (वार्ताहर)-
भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने देण्यात येणारा प्रतीष्ठेचा जेष्ठ कीर्तनकार सन्मान म्हापण येथील जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. रमाकांत बुवा ठाकुर यांना जाहीर करण्यात आला आहे कुडाळ-घावनळे येथे दि. १५ मे रोजी जेष्ठ कीर्तनकार सन्मान प्रदान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्ग तथा जेष्ठ कीर्तनकार सन्मान निवड समितीचे अध्यक्ष ह.भ.प. संजय पुनाळेकर यांनी दिली आहे.तब्बल ३० वर्षे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही न डगमगता त्यांनी कीर्तन भक्तीचा प्रसार आणि प्रचार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयात केला आहे. त्यांच्या कीर्तन क्षेत्रातील कार्याची दखल घेत हा सन्मान निवड समितीने एकमताने जाहीर करण्यात आला आहे . कै. ह.भ . प दत्ताराम सखाराम तथा तात्याबुवा जडये व कै. ह.भ.प. सीतारामबुवा पुनाळेकर यांच्या स्मरणार्थ ह.भ.प सुधीर जडये व ह. भ.प. संजय पुनाळेकर यांच्याकडून प्राप्त देणगीतून भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने हा सन्मान प्रती वर्षी प्रदान करण्यात येतो हा सन्मान श्री. स्वामी समर्थ मठ कासमळा, घावनळे येथे भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्ग च्या वतीने दि १५ में रोजी आयोजित करण्यात आलेल्या श्री. नारद जयंती उत्सवामध्ये सकाळी ११ वाजता प्रदान करण्यात येणार आहे. या दिवशी दिवसभर जिल्हयातील युवा महिला व जेष्ठ कीर्तनकारांची कीर्तने ऐकता येणार आहेत, तसेच जिल्हयातील नामवंत साधीदारांची संगीतसाथ सुध्दा या कार्यक्रमास लाभणार आहे. सर्व भाविक श्रोत्यांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन भगवदभक्ति प्रबोधिनी सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय पुनाळेकर व कार्यवाह दिनकर प्रभु-केळुसकर यांनी केले आहे.
Previous Articleजिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम
Next Article आजगाव येथील वेतोबा वर्धापनदिन सोहळा १८ मे रोजी









