डिचोली/प्रतिनिधी
जेष्ट नागरिकांसाठी समर्पित पणे कार्य करणाऱया रमाकांत उर्फ बाबू शेटय़? यांच्यासारख्या दातृत्ववान उद्योजकांची गरज आज समाजाला असून अशा कार्याला लोकप्रतिनिधी या नात्याने आपले सर्व ते सहकार्य लाभेल, असे उदगार डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेटय़? यांनी काढले.
बाबा सावईकर सेवा प्रतिष्ठान संचालित ज्येष्ट नागरिक सेवा केंद्र सेकंड इनिंग तर्फे आयोजित प्रतिष्ठानचे विश्वस्त रमाकांत शेटय़? यांच्या सुवर्णमहोत्सव वाढदीनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. शेटय़? बोलत होते. येथील प्राईड बॅन्कडस शेटय़ प्राईड सभागृहात या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीनुसार तिथीप्रमाणे हा जन्मदिन साजरा करण्यात आला. जेष्ट नागरिक देविदास उमर्ये यांनी तिथीनुसार जन्मदिन साजरा करण्याचे महत्त्व यावेळी सविस्तर पणे सांगितले. प्रारंभी जेष्ट नागरिक, व शेटय़? यांच्या कुटुंबियांतर्फे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते 50 पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या.
सूत्रसंचालन देऊ पळ व मारुती पाटील यांनी केले. आयोजन समितीचे अध्यक्ष म.कृ. पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानचे विश्वस्त सिद्धा?त रमाकांत शेटय़? यांचीही या वेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. संतोष चंदडगडकर ,राजाराम खोब्रेकर, श्री.सुभाष पै, प्रभाकर शिरोडकर, भास्कर जोशी,अश्विनी लामगावकर,राजाराम परब, राजेंद्र सावईकर,सुरेश गावस, रामचंद्र गर्दे, दीनानाथ तारी,नारायण बेतकेकर, वेंकटेश नाटेकर, माधव पराडकर, भीमराव देसाई, डॉ. शेखर साळकर,नारायण नार्वेकर , संध्या खानोलकर,आदी मान्यवरांनी या वेळी मनोगत व्यक्त करून बाबू शेटय़? याना शुभेच्छा दिल्या. प्रकाश शिरोडकर यांनी मानपत्र वाचन केले. शेवटीरमाकांत शेटय़? यांनी सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.









