वार्ताहर /नंदगड
अयोध्या येथे राम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त सोमवारी नंदगड येथील राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गावातील देव देवतांना गाऱ्हाणा व अभिषेक घालण्यात आला. सकाळी 10 वाजता गावातील जुने राम मंदिर व नवे राम मंदिर येथे पूजा, अर्चा करण्यात आली. जुने राम मंदिरातील प्रभू राम, लक्ष्मण व हनुमान मूर्तीची पूजा माजी आमदार अरविंद पाटील दांपत्याच्यावतीने करण्यात आली. जुने राम मंदिर येथे भव्य क्रीन बसवून अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्dयाचे प्रक्षेपण सर्वांना पाहण्याची व्यवस्था केली होती. दुपारी माजी आमदार अरविंद पाटील यांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन केले होते.
जुने राम मंदिर नव्याने बांधण्याचा निर्धार
नंदगड येथील जुने राम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करण्यात आला असून हे मंदिर नव्याने बांधण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. लोकांच्या आर्थिक सहभागातून हे मंदिर उभारण्यात येणार आहे. ज्यांना या मंदिरासाठी आर्थिक मदत करायची आहे. त्यांनी मंदिर जीर्णोद्धार कमिटीशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.









