काँग्रेसवर केले आरोप
तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या पलवई श्रावंती यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तर भारत राष्ट्र समितीत प्रवेश करत त्यांनी काँग्रेसला आणखी एक झटका दिला आहे. तेलंगणात 30 नोव्हेंबर मतदान होणार आहे. पलवई श्रावंती यापूर्वी मुनुगोडे पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार राहिल्या होत्या. परंतु निवडणुकीत त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या होत्या. भाजपमधून बाहेर पडत काँग्रेसमध्ये दाखल झालेले कोमाटिरे•ाr राजगोपाळ रे•ाr यांना पक्षाने मुनुगोडे मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. एका नेत्याच्या स्वरुपात ओळख मिळविण्यासाठी सन्मानाची आवश्यकता असते असे मानणे आहे. परंतु काँग्रेस पक्षात याची पूर्णपणे कमतरता दिसून आली. काँग्रेसमध्ये असताना अनेकदा अपमानित झाल्याचे वाटले. काँग्रेस पक्षात माझ्यासोबत घडलेल्या घटनांमुळे मला वेगळाच दृष्टीकोन मिळाला आहे. जुन्या गोष्टींमधून बाहेर पडत नवी सुरुवात करण्याची गरज आहे, याचमुळे मी बीआरएस पक्षात प्रवेश केला असल्याचे श्रावंती यांनी म्हटले आहे.









