रोहतक
साध्वी लैंगिक शोषणप्रकरणी हरियाणाच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत असलेला सिरसा डेरा प्रमुख नवव्यांदा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला अहे. दिल्ली निवडणुकीपूर्वी राम रहिमाला 30 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यावर राम रहिम सिरसा येथील स्वत:च्या आश्रमात पोहोचला आहे. राम रहीम मंगळवारी सकाळी तुरुंगातून हनीप्रीतसोबत रवाना झाला. यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राम रहिम पॅरोलवर बाहेर आला होता. लैंगिक शोषण आणि हत्येप्रकरणी राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.









