15 दिवसात कुस्तीपटूंना देणार प्रशिक्षण
बेळगाव : बालिका आदर्श कुस्ती संकुलन बेळगाव येथे मारूती घाडी कुस्ती आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक रामचंद्र पवार यांनी या संकुलनाला भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले. नुकत्याच आशिया कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदके मिळविली आहेत. या संघाचे प्रक्षिशक रामचंद्र पवार हे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक आहेत. त्यांनी भारतीय सेनादलातील कुस्तीपटूंना प्रशिक्षण दिले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांची आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. त्यांना कुस्ती प्रशिक्षक मारूती घाडी यांनी बालिका आदर्श कुस्ती संकुलनात आमंत्रित करून नवीन पद्धतीच्या कुस्तीचे तंत्र व शास्त्र याबद्दलचे मार्गदर्शन करण्याची विनंती केली. रामचंद्र पवारानी या सर्व कुस्तीपटूंना शुभेच्छा दिल्या. जवळपास 15 दिवस राम पवार हे बेळगावच्या होतकरून मल्लांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या शिबीराचा होतकरू कुस्तीपटूंना लाभ घ्यावा असे आवाहन मारूती घाडी यांनी केले आहे.









