उमरगा :
रामजन्मोत्सव निमित्त्याने शहरात सोमवारी सायंकाळी भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. मिरवणूकीत हजारो रामभक्त युवकांचा सहभाग होता. या निमित्ताने शहरात भगवे ध्वज, पताके लावण्यात आले होते.
कळस तांब्यापासून मिरवणूक चालू होऊन शहरातील मुख्य मार्गावरून वाजत गाजत काढण्यात आली.शहरातील विविध महत्वपुर्ण चौक, मुख्य रस्ते आदी ठिकाणाहून या मिरवणूकीने मार्गक्रमण केले. यावेळी भव्य अशा श्रीरामांच्या आकर्षक मुर्तीचे भक्तांनी दर्शन घेतले. यावेळी युवक डीजेवर नाचत होते. तसेच फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. या मिरवणूकीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.








