दक्षिण सोलापूर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील मेघराज साधक आश्रम येथे सिद्धारूढ मठामध्ये मठाधीश प. पू. बसमताई महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमी व सिद्धारूढ जन्मदिन पाळणा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
रामनवमीनिमित्त सिद्धारूढ मठामध्ये पहाटे सिद्धारूढ मूर्तीस अभिषेक, महाआरती, सहस्त्र बिलवार्चनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर दुपारी बारा वाजता पाळणाचा कार्यक्रम अनेक महिलांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पाळण्याचा कार्यक्रमास महिलाची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी युवा उद्योजक निलेश कोळी यांनी अन्नदानाच्या माध्यमातून मठाला मदत केली.
यावेळी मठाच्यावतीने मठाधीश प. पू. बसम्माताई महास्वामीजी यांच्या हस्ते युवा उद्योजक निलेश कोळी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास युवा उद्योजक निलेश कोळी, डॉ. अरवत पोलीस पाटील, सैपन बेगडे, पोलीस पाटील, धर्मा कोळी, माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी, प्रगतिशील शेतकरी महासिद्ध हंडे, भामाबाई टेळे, जगदेवी माशाळे, रुक्मिणी चिंचोळे, लिंबाव्वा स्वामी, शाम तेली , अदलिंग स्वामी, तुकाराम सरसंबी, राजू माशाळे, पिंटू जाधव, आप्पासाहेब खेत्रे, मुकिंदा पुजारी, विश्वनाथ तांबेकर, सिद्धाराम कोळी, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- माझ्या हातून सत्कार्य घडत असल्याने मी भाग्यवान
राम नवमी व मठाच्या विविध कार्यक्रमासाठी माझ्या हातून अन्नधान्यासारखे सत्कार्य घडत असल्याने स्वतःला भाग्यवान समजतो. कारण आयुष्यामध्ये सत्कार्य घडावे. यासाठी मी प्रयत्नशील असतो. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान समजून माझ्या हातून अन्नदानाचे कार्य घडत आहे. तसेच या मठामध्ये अध्यात्मिक कार्यक्रमासाठी सेवा घडत असल्याने समाधान आहे.
निलेश कोळी, युवा उद्योजक, सोलापूर








