पासद्वारे मिळणार दर्शन : 800 भाविकांना मिळणार दिवसभरात प्रवेश
वृत्तसंस्था/ अयोध्या
उत्तरप्रदेशच्या अयोयेत मंगळवारी राम मंदिर भवन निर्माण समितीच्या बैठकीत निर्मितीकार्यांची समीक्षा करण्यात आली. पहिलया मजल्यावर राम दरबार स्थापन केला जाणार आहे. मे महिन्याच्या प्रारंभीच्या 15 दिवसांच्या कालावधीतील शुभ मुहूर्तावर राम दरबार स्थापित होईल. राम दरबाराच्या दर्शनासाठी पासची व्यवस्था असेल अशी माहिती समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी दिली आहे.
एका तासात 50 लोकांना राम दरबारातील दर्शनासाठी पास जारी केला जाणार आहे. तर जवळपास 800 भाविक राम दरबाराचे प्रतिदिन दर्शन घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालयात 20 दालनांची निर्मिती सुरू झाली आहे. तसेच तेथील प्रसारणाकरता दालनांच्या कथेची समीक्षा करण्यात आली आहे. राम मंदिरात चालणारी सर्व निर्मिती कार्ये डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होतील असे नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले आहे.
ऑडिटोरियमचे काम 2025 नंतर पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. समितीच्या बैठकीत रामलल्लाच्या किरणाभिषेकावरूनही चर्चा झाली. रामनवमीच्या दिनी रामलल्लाचा किरणाभिषेक होणार आहे. आगामी 20 वर्षांपर्यंत रामनवमीच्या काळात किरणोत्सव पार पडणार आहे. किरणोत्सवाचे देशविदेशात थेट प्रसारण केले जाणार आहे. राम मंदिराच्या चारही द्वारांचे काम सुरू झाले असल्याचे सांगितले आहे.
रामनवमीच्या काळात चंपत राय हे द्वारांच्या नावांची घोषणा करणार आहेत. राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकांच्या नावावर राम मंदिराच्या चारही द्वारांना नाव देण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या कॅनोपी निर्माण केली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास रामनवमीच्या काळात कॅनोपी आणि मॅटची तात्पुरत्या स्वरुपात राम मंदिर ट्रस्ट व्यवस्था करणार आहे









