ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (BJP) यांनी एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owesi) यांनी उद्धव ठाकरे ( Udhav Thakre ) आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देत भाजप आणि ओवेसी हे राम आणि श्यामची जोडी असल्याचे म्हटले आहे. शनिवारी ओवेसी यांनी ठाण्यातील सभेत शिवसेनेवर टीका करून उद्धव आणि शिंदे हे राम आणि श्यामची जोडी असल्याचे म्हटले आहे.
ठाणे येथे पार पडलेल्या मेळाव्यात मुस्लिम समुदायाला संबोधित करताना असदद्दीन ओवेसी यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, “जेव्हा राष्ट्रवादीचे अजित पवार आणि सुप्रिया सुळे नेते होऊ शकतात, उद्धव ठाकरे केवळ बापाचा मुलगा असल्याच्या जोरावर नेता होऊ शकतात, एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस हे नेते होऊ शकतात, तेव्हा महाराष्ट्रातील मुस्लिम हे शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासारखे होऊ शकत नाहीत का? एकनाथ शिंदे, असा सवाल ओवेसी यांनी केला होता.
महाराष्ट्राच्या राजकारणावर ओवेसींच्या टिकेला उत्तर देताना उद्धव सेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, भाजप आणि असदुद्दीन ओवेसी हे राम आणि श्यामची जोडी आहेत.पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील महापुरुष म्हणून वीर सावरकरांना गौरव करून राऊत त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. त्यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








