वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘आमची राष्ट्रीय लोकशाही आघाडी काळाच्या कसोटीवर खरी ठरलेली युती आहे. देशाचा विकास हेच आमचे एकमेव ध्येय आहे. आमच्या विरोधात एकत्र येण्याचा विरोधकांचा प्रयत्न हा प्रत्यक्षात घराणेशाही वाचविण्यासाठी आणि स्वत:च्या भ्रष्टाचार लपविण्यासाठी केलेला एक डावपेच आहे. देशातील मतदार सुजाण असून तो विरोधकांच्या फसव्या जाळ्यात अडकणार नाही. देशाला प्रगतीपथावर नेण्याची खरी क्षमता कोणामध्ये आहे, याची मतदारांना पुरेपूर जाणीव आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन भाषण करताना केले. येथील अशोका हॉटेलमध्ये आयोजित या बैठकीला भारतीय जनता पक्षासह 38 पक्षांचे नेते उपस्थित होते.
या बैठकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मंगळवारी जणू 2024 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. विरोधकांवर टीकेचे आसूड ओढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रालोआच्या सज्जतेचीच चुणूक दाखविली. विरोधक एकत्र आले तरी त्यांच्या विरोधात विजय संपादन करण्याचा आत्मविश्वास या आघाडींला असल्याचे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून स्पष्ट होत होते, अशी प्रतिक्रिया तज्ञांनी दिली.
रालोआचा विस्तार
लोकसभा निवणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विस्तार करुन देशाच्या कानाकोपऱ्यातील जास्तीत जास्त पक्षांचा त्या समावेश करुन घेण्याची भाजपची योजना आहे. त्यानुसार पूर्वी रालोआत असणाऱ्या, पण आता ही आघाडी सोडून गेलेल्या पक्षांना पुन्हा रालोआत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे या आघाडीतील पक्षांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मंगळवारच्या बैठकीला या पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित होते.
नेते, पदाधिकारी उपस्थित
या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा, पक्षाचे विविध पदाधिकारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक मंत्री आणि भाजपचे नेतेही उपस्थित होते. या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तसेच पुढच्या लोकसभा निवडणुकीत एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. आगामी काळात आघाडीचा आणखी विस्तार होण्याची शक्यता असल्याने नव्या पक्षांशी आणि जुन्या मित्र पक्षांशीही संपर्कात राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन आठड्यांमध्ये या आघाडीत बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक प्रादेशिक पक्षांनी प्रवेश केला आहे. तसेच समाजवादी पक्षाचे काही नेतेही भाजपमध्ये समाविष्ट झाले आहेत. एकंदर, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आघाडीने आपल्या हालचाली गतीमान केल्या असून लवकरच प्रचाराला अधिकृत प्रारंभ होणार आहे.
रालोआतील राजकीय पक्ष
- भारतीय जनता पक्ष, 2. शिवसेना (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील), 3. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील), 4. राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष (पशुपती कुमार पारस यांच्या नेतृत्वातील), 5. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, 6. अपना दल (सोनेलाल पटेल गट), 7. नॅशलन पीपल्स पार्टी, 8. नॅशनॅलिस्ट डेमॉव्रेटिक प्रोग्रेसिन्ह पार्टी, 9. ऑल झारखंड स्टुडंट्स् य्नियन, 10. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा, 11. मिझो नॅशनल फ्रंट, 12. इंडिजियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा, 13. नागा पीपल्स फ्रंट, नागालँड, 14. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), 15. आसाम गणपरिषद, 16. पट्टाली मक्कळ काची, 17. तामिळ मनिलाय काँग्रेस, 18. युनायडेट पीपल्स पार्टी लिबरल, 19. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, 20. शिरोमणी अकाली दल (संयुक्त), 21. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, 22. जननायक जनता पक्ष, 23. प्रहार जनशक्ती पक्ष, 24. राष्ट्रीय समाज पक्ष, 25. जनसुराज्य शक्ती पक्ष, 26. कुकी पीपल्स अलायन्स, 27. युनायटेड डेमॉव्रेटिक पार्टी (मेघालय), 28. हिल स्टेट पीपल्स डेमॉव्रेटिक पार्टी, 29. निशाद पक्ष, 30. अखिल भारतीय एन. आर. काँग्रेस, 31. हिंदुस्थानी आवाम मोर्चा, 32. जन सेना पार्टी, 33. हरियाणा लोकहित पक्ष, 34. भारत धर्म जनसेना पक्ष, 35. केरळा कामराज काँग्रेस, 36. पुथिया तामिळगम पक्ष, 37. लोकजनशक्ती पक्ष (राम विलास पास्वान), 38. गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट
काय म्हणतात विविध नेते…
ड राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे एकमेव ध्येय देशाचा विकास घडविणे हेच आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये या ध्येयाच्या पूर्ततेसाठीच आम्ही कार्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (भारतीय जनता पक्ष)
ड राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमधील लोकसभेच्या सर्व 40 जागांवर विजयी होईल. आम्ही आघाडीला बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
चिराग पास्वान, (रामविलास पास्वान लोकजनशक्ती पक्ष)
ड अनेक नव्या पक्षांच्या समावेशाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी अधिकच बळकट झाली असून आमचा निवडणुकीतील विजय आताच निश्चित झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (भारतीय जनता पक्ष)









