जिल्हाधिकाऱयांनी केले उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
महसूल विभागातील कामे तातडीने निवाडा करण्यासाठी सकाल योजना 2012 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेला 10 वर्षे पूर्ण झाल्याने महसूल विभागातील कर्मचाऱयांनी रॅली काढली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
गेल्या वर्षभरात सकालमध्ये एकूण 1 लाख 30 हजार 542 अर्ज आले होते. त्यामधील तब्बल 1 लाख 21 हजार 942 अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. सर्वसामान्य जनतेला तातडीने कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 99.17 टक्के सकालमधील कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सकाल योजना 2 एप्रिल 2012 रोजी सुरू करण्यात आली. त्याला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. एकूण 99 ठिकाणी सकाल केंदे आहेत. यामध्ये 1 हजार 115 कर्मचारी काम करत आहेत. ग्रेड 2 तहसीलदार मोहन आणि सकाल समालोचक गुरुराज उप्पीन यांच्या मार्गदर्शनाखाली याचे कामकाज सुरू आहे. सकालच्या माध्यमातून महसूल विभागातील कामे निकालात काढली जात आहेत. जनतेनेही उत्तम प्रतिसाद दिला आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सकालचे कामकाज सुरू असून यापुढेही अत्यंत काळजीपूर्वक कामे केली जातील, असे आश्वासन कर्मचाऱयांनी दिले.









