बेळगाव : एम. व्ही. हेरवाडकर शाळेच्या एनसीसी विभागातर्फे तंबाखूविरोधी दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. तंबाखूचे दुष्परिणाम दाखविणारे फलक विद्यार्थ्यांनी तयार करून जनजागृती केली. याशिवाय स्लाईड शोसुद्धा सादर केला.
यावेळी बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या सदस्या बिंबा नाडकर्णी, प्राचार्य सुनील कुसाणे, उपप्राचार्य अरुण पाटील, एनसीसी अधिकारी रेश्मा पाटील व शिक्षक उपस्थित होते.









