प्रियकर वासु भगनानीसोबत थाटणार संसार
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि निर्माता जॅकी भगनानी हे 22 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध होणार आहेत. या विवाहसोहळ्यात केवळ कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार सामील होणार आहे. दोघेही स्वत:च्या खासगी आयुष्याशी निगडित अधिक वाच्यता इच्छित नसल्याने त्यांनी हा सोहळा निवडक लोकांपुरती आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जॅकी सध्या बँकॉकमध्ये असून तो स्वत:च्या बॅचलर पार्टीचा आनंद घेत आहे. तर रकुल थायलंडमध्ये सुटी व्यतित करत आहे. रकुल आणि जॅकी सुमारे 2 वर्षांपासून परस्परांना डेट करत आहेत. रकुलने 2022 मध्ये स्वत:च्या जन्मदिनी जॅकीसोबतचे एक छायाचित्र शेअर करत रिलेशनशिपची घोषणा केली होती. तसेच तिने जॅकीला वर्षातील सर्वात चांगली भेट संबोधिले होते. रकुलने वयाच्या 18 व्या वर्षीच मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती. यानंतर 2009 मध्ये तिने कन्नड चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 2014 मध्ये तिने ‘यारियां’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आतापर्यंत तिने 41 चित्रपटांमध्ये काम केले आहे. आगामी काळात ती कमल हासन यांच्यासोबत इडियन 2 या चित्रपटात दिसून येणार आहे. जॅकी भगनानी हा बॉलिवूडचा आघाडीचा निर्माता आहे.









